IPL संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी, इथे लाईव्ह प्रक्षेपणही बंद

IPL चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी, इथून पाहता येणार नाहीत सामने, नेमकं काय कारण? 

Updated: Apr 6, 2022, 08:39 AM IST
IPL संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी, इथे लाईव्ह प्रक्षेपणही बंद title=

मुंबई: आयपीएलप्रेमींसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग आहे. जगभरातील खेळाडू यामध्ये सहभागी होत असतात. आता या लीगदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताशेजारील देशात प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

भारताशेजारील देशात सध्या मोठं आर्थिक संकट आहे. तिथे लोकांना जगणंही कठीण झालं आहे. महागाई आणि आर्थिक संकटामुळे आयपीएल प्रक्षेपणासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला. 

श्रीलंकेमध्ये सध्या आर्थिक स्थिती वाईट आहे. त्यामुळे आयपीएलच्या बातम्या दोन वृत्तपत्र देऊ शकत नाहीत. सध्या ते आर्थिक संकटाच्या बातम्यांवर लक्ष केंद्रीत करत आहेत. 

आर्थिक स्थिती वाईट असल्याने आयपीएलचं प्रक्षेपण करणाऱ्या वाहिन्यांमधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची स्थिती आली आहे. त्यामुळे आयपीएलचं प्रक्षेपण (broadcast and media coverage)  बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

श्रीलंका सरकारने काही आठवड्यांपूर्वी पेपर पुरवठा नसल्यामुळे शालेय परीक्षा बंद केल्या होत्या. मुंबई इंडियन्सचे मुख्य कोच  जयवर्धने यांनी देशातील स्थितीबाबत संताप व्यक्त केला होता.  श्रीलंकेची स्थिती पाहून खूप दु:ख होत आहे. 

आयपीएलमध्ये श्रीलंकेचे खेळाडू देखील खेळत आहेत. श्रीलंकेत परिस्थिती अत्यंत वाईट आहे.आयपीएलचं प्रक्षेपण बंद केल्यानं श्रीलंकेतील लोकांना आता आयपीएलचे सामने पाहाता येणार नाहीत.