IPL : कोहलीनंतर 'हा' खेळाडू होणार RCB चा कर्णधार

RCB संघात कोहली आता फक्त खेळाडू 

Updated: Nov 29, 2021, 11:29 AM IST
IPL : कोहलीनंतर 'हा' खेळाडू होणार RCB चा कर्णधार

मुंबई : आयपीएल 2021 संपल्यानंतर विराट कोहलीनेही आरसीबीचे कर्णधारपद सोडले आहे. आता विराट केवळ आरसीबीमध्ये खेळाडू म्हणून खेळणार आहे. विराटच्या नेतृत्वाखाली या संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही आणि त्यामुळेच त्याने आता कर्णधारपदही सोडले आहे. 

मात्र विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीला आता एका नव्या कर्णधाराची गरज भासणार आहे ज्यासाठी अनेक तगडे खेळाडू दावेदार आहेत. त्यामुळे आता नवा कर्णधार कोण असणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

आरसीबीच्या कर्णधार पदाकरता भविष्यवाणी 

आरसीबीच्या नव्या कर्णधाराबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने म्हटले आहे की, आरसीबीला लिलावातच आपला नवा कर्णधार शोधावा लागेल. 

स्टार स्पोर्ट्स शोमध्ये पठाण म्हणाले की, RCB लिलावापूर्वी राखून ठेवलेल्या खेळाडूंपैकी कोणत्याही खेळाडूची निवड करणार नाही. दरम्यान, पठाण ग्लेन मॅक्सवेलबद्दल म्हणाला की, आरसीबीने मॅक्सवेलला कर्णधार म्हणून निवडू नये.

मॅक्सवेलची याकरता होऊ नये कर्णधारपदी निवड 

मॅक्सवेलला कर्णधार बनवण्याचं कारणही पठाणनं दिलं आहे. वास्तविक, पठाणचे मत आहे की, मॅक्सवेल हा कर्णधार होण्यासाठी चांगला दावेदार आहे, पण तो मुक्त खेळाडू आहे आणि त्याच्यावर कर्णधारपदाचा दबाव टाकणे योग्य नाही. या खेळाडूला कर्णधारपद दिल्याने त्याच्या खेळावर मोठा परिणाम होऊ शकतो, असेही पठाण सांगतो. त्यामुळे आरसीबीला लिलावातूनच खेळाडू शोधावा लागणार आहे.

कर्णधार पदाच्या स्पर्धेत हे दोन खेळाडू 

आरसीबीचा नवा कर्णधार होण्यासाठी अनेक दावेदार असले तरी, असे दोन खेळाडू आहेत जे या पदासाठी खरोखरच प्रबळ उमेदवार असू शकतात. हे खेळाडू दुसरे कोणी नसून केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आहेत. हे दोन्ही खेळाडू आपला संघ सोडून लिलावात जाणार आहेत.

श्रेयस अय्यर आणि राहुल या दोघांनाही कर्णधारपदाचा खूप अनुभव आहे. जिथे एकीकडे राहुलला लखनऊ संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते अशा बातम्या ऐकायला मिळत आहेत. तर अय्यरला आरसीबीचा कर्णधार म्हणून पाहिले जाऊ शकते.

कोहलीला नाही मिळालं यश 

विराट कोहली गेली 8 वर्षे आरसीबीचा कर्णधार आहे, पण तो आतापर्यंत आपली फ्रँचायझी चॅम्पियन बनवण्यात अपयशी ठरला आहे, त्यामुळे त्याच्यावर ही जबाबदारी सोडण्याचा सतत दबाव होता आणि आता जे अपेक्षित होते तेच घडले. या खेळाडूच्या नेतृत्वाखाली आरसीबीने 2016 चा फायनल नक्कीच खेळला होता, पण तिथेही त्यांचा सनरायझर्स हैदराबादकडून पराभव झाला होता.