मुंबई : श्रेयस अय्यर विरुद्ध ऋषभ पंत आज सामना होत आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दिल्ली टीम यावेळी म्हणावं तेवढ्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही. तर कोलकाता टीमने यावेळी सुरुवातीपासून चांगला फॉर्म ठेवला आहे.
पॉईंट टेबलवर कोलकाता टीम आपला पहिला क्रमांक कायम ठेवणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वामध्ये कोलकाता टीम चांगल्याप्रकारे खेळत आहे.
आतापर्यंत कोलकाता विरुद्ध दिल्ली आतापर्यंत 29 सामने खेळले आहेत. दिल्लीने 12 सामने जिंकले तर कोलकाताने 16 सामने जिंकले आहेत. हेड टू हेडमध्ये कोलकाता टीम वरचढ ठरली आहे. एक सामना अनिर्णत राहिला आहे.
4 सामने खेळून कोलकाता टीम पहिल्या स्थानावर आहे. 4 पैकी 3 सामने जिंकले तर 1 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. दिल्ली टीम 3 पैकी 1 सामना हरले आहेत. तर दोन सामने जिंकले आहेत.
कोलकाता टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन : व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार) नीतीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, सुनील नरैन, उमेश यादव, रासिख सलाम, वरुण चक्रवर्ती.
दिल्ली टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन : ऋषभ पंत (कर्णधार), पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, डेव्हिड वार्नर, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, एनरिक नॉर्किया.