IPL 2022, LSG vs CSK | चेन्नईकडून लखनऊला विजयासाठी 211 धावांचं मजबूत आव्हान

 चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) लखनऊ सुपर जायंट्सला (lucknow super giants) विजयासाठी 211 धावांचे मजबूत आव्हान दिले आहे.

Updated: Mar 31, 2022, 09:30 PM IST
IPL 2022, LSG vs CSK | चेन्नईकडून लखनऊला विजयासाठी 211 धावांचं  मजबूत आव्हान  title=

मुंबई : चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) लखनऊ सुपर जायंट्सला (lucknow super giants) विजयासाठी 211 धावांचे मजबूत आव्हान दिले आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 210 धावा केल्या. चेन्नईकडून सलामीवीर रॉबिन उथ्प्पाने सर्वाधिक 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. (ipl 2022 lsg vs csk chennai super kings set 211 runs target for win lucknow super giants)

उथ्प्पाशिवाय शिवम दुबेने 49 रन्स केल्या. शिवन दुबेचं अवघ्या 1 धावेने अर्धशतक हुकलं.  मोईल अलीने 35 धावा चोपल्या. तर अंबाती रायुडुने 27 धावांचं योगदान दिलं. 

कॅप्टन रवींद्र जाडेजाने अखेरीस फटकेबाजी करत नाबाद 17  धावा केल्या. तर महेंद्रसिंह धोनीही 16 रन्सवर नॉटआऊट राहिला. 

लखनऊकडून आवेश खान, एंड्रयू टाय आणि रवी बिश्नोई या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.