IPL 2022 Auctions Date: मेगा ऑक्शनबाबत मोठी माहिती, जाणून घ्या कधी होणार खेळाडूंचा लिलाव

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी सर्व संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आता जाणून घ्या ऑक्शन कधी होणार

Updated: Dec 1, 2021, 08:03 PM IST
IPL 2022 Auctions Date: मेगा ऑक्शनबाबत मोठी माहिती, जाणून घ्या कधी होणार खेळाडूंचा लिलाव

IPL 2022 Auction Date : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) पुढील हंगामाचा बिगुल वाजला आहे. IPL 2022 पूर्वी खेळाडूंचा मेगा ऑक्शन पार पडणार आहे. याआधी, जुन्या आठ संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएल 2022 मध्ये दोन नवीन संघ देखील दाखल होणार आहेत आणि या नवीन संघांना 25 डिसेंबरपूर्वी त्यांच्या तीन खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे. दरम्यान, IPL 2022 च्या मेगा ऑक्शनबाबत (IPL 2022 Auction) एक मोठे अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, IPL 2022 चा मेगा ऑक्शन डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो. मात्र, आतापर्यंत भारतीय क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या लिलावाबाबत कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही.

आईपीएल 2022 मध्ये 10 संघ
आयपीएल 2022 मध्ये यावेळी आठ ऐवजी 10 संघ सहभागी होतील. लखनऊ (Lucknow) आणि अहमदाबाद (Ahmedabad) हे आयपीएलचे दोन नवे संघ असतील. हे संघ लिलाव पूलमधून प्रत्येकी तीन खेळाडू राखू शकतात.  केएल राहुलकडे लखनऊची कमान सोपवली जाऊ शकते.

2 एप्रिलपासून स्पर्धा?
आयपीएलचा पुढचा हंगाम 2 एप्रिल 2022 पासून सुरू होऊ शकतो, अशी माहिती आली होती. आयपीएलचा पुढचा हंगाम भारतात खेळवला जाईल, असं बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे. आयपीएलमधील सर्व 10 संघ घरच्या मैदानावर सात सामने आणि इतर ठिकाणी सात सामने खेळणार आहे.

रिटेन खेळाडूंची यादी जाहीर
IPL 2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी, आधीच्या सर्व 8 फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. यात अनेक आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले आहेत. आयपीएलच्या अनेक स्टार खेळाडूंनी यादीत स्थान गमावलं आहे, तर अनेक युवा खेळाडूंना लॉटरी लागली आहे. 

सर्वात जास्त किंमतीवर रिटेन केलं गेलेल्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), रविंद्र जडेचा (Ravindra Jadeja) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant)  टॉपवर आहेत. विशेष म्हणजे विराट कोहली (Virat Kohli) आणि महेंद्रसिंग धोणीला (MS Dhoni) गेल्या हंगामा पेक्षा कमी किंमत मिळाली आहे.