मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 11 वा सामना चेन्नई विरुद्ध पंजाब झाला. या सामन्यात चेन्नईला 54 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तीन सामने चेन्नईनं गमवले आहेत. यंदा चेन्नईत अनेक युवा आणि नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली. त्यातले काही चांगली कामगिरी करत आहेत. तर काही अत्यंत वाईट. वाईट फॉर्ममुळे एका खेळाडूचं करिअर धोक्यात येण्याची शक्यता आहे.
चेन्नई विरुद्ध लखनऊ 7 वा सामना मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने 25 वर्षीय वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. मुकेश चौधरी यांच्या नावावर कोणीही चर्चा करत नव्हते. स्टीफन फ्लेमिंग आणि कर्णधार रवींद्र जडेजा यांच्या नेतृत्वाखाली संधी देण्यात आली.
मुकेशने आपली कामगिरी उत्तम केली नाही. त्याने 91 धावा देऊन 1 विकेट घेतली. त्याच्या वाईट फॉर्मचा फटका टीमला झाला. खराब कामगिरीमुळे त्याला टीममध्ये यापुढे संधी मिळणं कठीण होऊ शकतं.
लखनऊ विरुद्धच्या सामन्यात त्याने 3 ओव्हर 3 बॉल टाकले. त्याने 39 धावा दिल्या आणि एकही विकेट मिळाली नाही. त्याने पंजाब विरुद्ध सामन्यात 4 ओव्हरमुळे 52 धावा देऊन एक विकेट घेतली. त्याचा फायदा पंजाब संघाला झाला आणि चेन्नईच्या हातून सामना गेला.
मुकेश चौधरीचा जन्म 6 जुलै 1996 रोजी राजस्थानमध्ये झाला. लेफ्ट हॅण्ड वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. गेल्या मोसमातही हा खेळाडू नेट बॉलर म्हणून चेन्नईससोबत होता.
मुकेश चौधरीने घरच्या मैदानावर 12 टी-20 सामने खेळले असून 16 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 5 सामन्यात 10 विकेट घेतल्या होत्या. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 10 सामन्यांमध्ये 33 विकेट्स आणि लिस्ट ए क्रिकेटच्या 12 सामन्यांमध्ये 17 बळी घेतले आहेत. मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईने त्याला 20 लाखांना घेतलं आहे.