टी 20 वर्ल्ड कपआधी BCCIची वाढली चिंता; 'या' स्टार खेळाडूंचा IPLमध्ये फ्लॉप शो

IPL 2022 च्या ट्रॉफीवर गुजरात टायटन्सने नाव कोरले. 

Updated: May 30, 2022, 04:42 PM IST
 टी 20 वर्ल्ड कपआधी BCCIची वाढली चिंता; 'या' स्टार खेळाडूंचा IPLमध्ये फ्लॉप शो title=

मुंबई : IPL 2022 च्या ट्रॉफीवर गुजरात टायटन्सने नाव कोरले. यानंतर आयपीएलमधल्या अनेक खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा सुरु झालीय.यामध्ये अनेक युवा खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक होतेय तर काही सिनियर खेळाडूंवर टीका होतेय.  कारण टीम इंडीयात असणाऱ्या या खेळाडूंची कामगिरी फ्लॉप ठरलीय. नेमके हे खेळाडू कोण आहेत ते जाणून घेऊयात. 

विराट कोहली
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकाच्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या विराट कोहलीचा हा हंगाम खुप वाईट ठरलाय. त्याला 16 सामन्यांमध्ये केवळ 2 अर्धशतके झळकावता आली. कोहलीला या मोसमातील 16 सामन्यांत 22.73 च्या सरासरीने केवळ 341 धावा करता आल्या. विराट कोहली 3 सामन्यात गोल्डन डकचा बळी ठरला.

रोहित शर्मा 
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासाठी देखील हा हंगाम काही खास ठरला नाही. रोहितने 14 सामन्यांत केवळ 268 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकले नाही. रोहितची सर्वोत्तम धावसंख्या ४८ होती. तसेच  पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईने यावेळी शेवटचे स्थान पटकावले होते. 

रवींद्र जडेजा
IPLच्या 15व्या हंगामापूर्वी रवींद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी चांगली झाली नाही. त्यामुळे जाडेजाने कर्णधारपद सोडले होते. तसेच कर्णधारपदानंतर जडेजाला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते.या मोसमात रवींद्र जडेजाने 10 सामने खेळले. त्याच्या बॅटमधून केवळ 116 धावा झाल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 118 होता. बॅट व्यतिरिक्त जडेजा गोलंदाजीतही फ्लॉप ठरला आणि त्याला केवळ 5 विकेट मिळाल्या होत्या. 

ऋषभ पंत
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आयपीएल-15 मध्ये अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नाही. 14 सामन्यांत 31 च्या सरासरीने केवळ 340 धावा करता आल्या. त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकले नाही. वेगवान फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पंतला या मोसमात केवळ 16 षटकार मारता आले.

दरम्यान टीम इंडियातले हे चारही खेळाडू संघात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. मात्र आयपीएलमधला त्यांचा परफॉर्मन्स पाहून बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे. तसेच टी 20 वर्ल्ड कपपर्यंत जर या खेळाडूंचा असाच फॉर्म राहीला तर भारतीय संघासाठी मोठी अडचण होणार आहे.