IPL 2022, GT vs RR | गुजरात टायटन्सचा राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्सने विजय, फायनलमध्ये एन्ट्री

डेव्हिड मिलरच्या (David Miller) फटकेबाजीच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. 

Updated: May 24, 2022, 11:43 PM IST
IPL 2022, GT vs RR | गुजरात टायटन्सचा राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्सने विजय, फायनलमध्ये एन्ट्री title=

कोलकाता :  डेव्हिड मिलरच्या (David Miller) फटकेबाजीच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह गुजरातने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. राजस्थानने गुजरातला विजयासाठी 189 धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मिलर आणि कॅप्टन हार्दिक पंड्या या जोडीने गुजरातला विजयापर्यंत पोहचवलं. (ipl 2022 playoffs qualifier 1 gt vs rr gujrat tittans beat rajsthan royals by 7 wickets and enter to final)

गुजरातकडून मिलरने सर्वाधिक नाबाद 68 धावांची खेळी केली. हार्दिकने नॉट आऊट 40 रन्स केल्या. तर शुबमन गिल आणि मॅथ्यू वेड यो दोघांनी प्रत्येकी 35 धावांचं योगदान दिलं. राजस्थानकडून ट्रेन्ट बोल्ट आणि Obed McCoy या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

दरम्यान गुजरातने या विजयासह अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामना 29 मे ला खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता गुजरात आयपीएल चॅम्पियन होण्यापासून एक पाऊल दूर आहे. 

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन-विकेटकीपर), जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणनि ओबेड मॅकॉय. 

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन  : हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, अल्जारी जोसफ, यश दयाल आणि मोहम्मद शमी.