IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात झाली आहे. चेन्नई आणि कोलकाता संघामध्ये पहिला सामना रंगत आहे. पण या सामन्याआधी सीएसकेने आपल्या संघात एक मोठा बदल केला आहे. हा निर्णय अनेकांसाठी हैराण करणारा होता. कारण धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या जागी रवींद्र जडेजाला कर्णधार करण्यात आलं आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे मैदानावर होत आहे. चेन्नईच्या चाहत्यांसाठी हा सामना खास असणार आहे, कारण यावेळी महेंद्रसिंह धोनी नव्हे तर रवींद्र जडेजा संघाची कमान सांभाळणार आहे.
आयपीएल सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजाला कर्णधार म्हणून घोषित केले. या निर्णयानंतर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे. रिवाबाने तिच्या फेसबुक अकाऊंटवर सीएसकेचे आभार मानले आणि महेंद्रसिंह धोनीचे विशेष आभारही मानले.
रिवाबाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'हे यश मिळवल्याबद्दल अभिनंदन, तुम्ही याच्या पात्र आहात. माही भाईचे आभार, ज्यांनी तुझ्यावर विश्वास दाखवला आणि ही संधी दिली. तुम्ही नेहमीच लीडर राहाल आणि संघाचे थाला राहाल. रिवाबाने या पोस्टसोबत धोनी-जडेजाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये मागे CSK चे थीम साँग वाजत आहे.
धोनीने आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. सीएसकेकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे की एमएस धोनीने निर्णय घेतला आहे की आता रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असेल.
रवींद्र जडेजा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संघाची कमान सांभाळणार असून त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रवींद्र जडेजाने आदेश मिळाल्यानंतर सांगितले की, मला कशाचीही चिंता नाही, कारण एमएस धोनी सोबत असेल तर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळेल.