IPL 2022 Retention | मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मासह 3 खेळाडू रिटेन, 'सिक्सर किंग'चा पत्ता कट

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलमधील (IPL) आतापर्यंतची यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण 5 वेळा विजेतेपद जिंकलं आहे.

Updated: Nov 30, 2021, 11:03 PM IST
IPL 2022 Retention | मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मासह 3 खेळाडू रिटेन, 'सिक्सर किंग'चा पत्ता कट

मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलमधील (IPL) आतापर्यंतची यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण 5 वेळा विजेतेपद जिंकलं आहे. बीसीसीयच्या नियमांनुसार फ्रँचायजी आगामी 15 व्या कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार (IPL 2022 Retention) आणि कोणाला वगळणार, याची यादी देण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार मुंबईने स्टार खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे. तर एका मॅचविनर क्रिकेटरला डच्चू दिला आहे. विशेष म्हणजे या खेळाडूने अनेकदा मुंबईला एकहाती सामना जिंकून दिला आहे. मुंबईने कोणाला रिटेन म्हणजेच कायम ठेवलं आहे, याबाबत आपण जाणून घेऊयात. (IPL 2022 Retention Mumbai Indians have retained Suryakumar Yadav and Kieron Pollard alongside Rohit Sharma and Jasprit Bumrah) 

हे खेळाडू संघात कायम

ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार मुंबईने कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड आणि जस्प्रीत बुमराहला कायम ठेवलं आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने 5 वेळा विजेतेपद जिंकलं आहे. बुमराहने नेहमीच घातक आणि किफायतशीर गोलंदाजी केली आहे. पोलार्डने अनेकदा अनेक अशक्य वाटणारे सामने एकहाती जिंकून दिले आहेत. सूर्यकुमारही सातत्याने धमाकेदार खेळी करतोय.

या चौघांव्यतिरिक्त अशा एक खेळाडू होता ज्याने मुंबईसाठी निर्णायक खेळी केली आहे. मात्र मुंबईने त्याला रिटेन केलं नाही. मुंबईने विकेटकीपर बॅट्समनला संघात स्थान दिलेलं नाही. ईशान आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा सिक्सर किंग होता. त्याने सर्वाधिक 30 सिक्स खेचले होते. मात्र अखेर त्याला रिटेन केलं गेलं नाही.

हार्दिकला डच्चू

स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्यालाही डच्चू देण्यात आला आहे. हार्दिक गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करतोय. त्यामुळे त्याचं मुंबईसह टीम इंडियामधील स्थानही धोतक्यात आलंय. हार्दिकला 14 व्या मोसमात विशेष अशी कामगिरी करता आली नाही. इतकचं नाही तर हार्दिकचा भाऊ कृणाललाही वगळण्यात आलंय. हे दोघेही आक्रमक आणि अष्टपैलू आहेत. मात्र गेल्या मोसमात या दोघांना आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.