फाफ ड्यु प्लेसिसची जागा कोण? कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसमोर मोठं प्रश्नचिन्हं

तुम्हाला काय वाटतं, फाफ ड्यु प्लेसिसची जागी खेळण्याची संधी कोणाला द्यावी?

Updated: Mar 21, 2022, 04:27 PM IST
फाफ ड्यु प्लेसिसची जागा कोण? कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसमोर मोठं प्रश्नचिन्हं title=

मुंबई : आयपीएल सुरू होण्यासाठी अवघे बोटावर मोजण्याएवढे दिवस शिल्लक आहेत. दीपक चाहरला दुखापत असल्याने पहिले काही सामने तो खेळू शकणार नाही. तर पहिल्या सामन्यात मोईन अली देखील पोहोचणार नाही. दुसरीकडे फाफ डु प्लेसिस चेन्नईतून गेल्यानं आता एक मोठा आधार गेला आहे. 

फाफ डु प्लेसिसच्या जागी ओपनिंगला कोणाला उतरवायचा हा महेंद्रसिंह धोनीसमोर मोठा प्रश्न आहे. ऋतुराज गायकवाड आणि दुसरं कोण ओपनिंगला मैदानात कोणाला उतरवायचं यावर सध्या धोनी विचार करत आहे. फाफ डु प्लेसिसला बंगळुरू संघाने मेगा ऑक्शनमध्ये आपल्या संघात घेतलं.  

फाफ डु प्लेसिस बंगळुरू संघाचं नेतृत्व करणार आहे. तर दुसरीकडे धोनीचा खास सुरेश रैनालाही यंदा चेन्नईनं आपल्या संघात घेतलं नाही. त्यामुळे आता नव्या खेळाडूंपैकी धोनी कोणाला संधी देणार ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.  26 मार्च रोजी चेन्नई विरुद्ध कोलकाता आयपीएलमधील पहिला सामना होणार आहे. 

भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठान याने आपलं प्रेडिक्शन सांगितलं आहे. कॅप्टन कूल धोनी ओपनिंगला दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू उतरवण्याची शक्यता आहे. 

फाफ डु प्लेसिसच्या डागी एकतर न्यूझीलंडचा खेळाडू डेवोन कॉनवे ही पहिला पसंती असणार आहे. तर दुसरी पसंती रॉबीन उथप्पा असू शकते. रॉबिनला 2 कोटी रुपये देऊन संघात घेण्यात आलं आहे. कॉनवेला संधी दिली नाही तर त्या जागी रॉबिनला संधी मिळू शकते असं इरफान पठान यांनी सांगितलं आहे. 

इरफान पठान यांच्या मते जर उथप्पाने ओपनिंग केली तर चेन्नईसाठी ते फायद्याचं ठरू शकतं. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात चेन्नईला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.