IPL 2023 LSG vs DC: तुमच्या Dream 11 संघात कोणाला देणार संधी, कोण असणार कर्णधार? जाणून घ्या फँटन्सी टिप्स

IPL 2023 LSG vs DC Dream 11 Prediction: लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ आज भिडणार आहे. आयपीएलच्या (Indian Premiere League) 16 व्या हंगामातील हा त्यांचा पहिलाच सामना असून यावेळी दोन्ही संघ विजयी सुरुवात करण्याच्या अपेक्षेने मैदानात उतरतील.   

Updated: Apr 1, 2023, 04:35 PM IST
IPL 2023 LSG vs DC: तुमच्या Dream 11 संघात कोणाला देणार संधी, कोण असणार कर्णधार? जाणून घ्या फँटन्सी टिप्स title=

IPL 2023 LSG vs DC Dream 11 Prediction: आयपीएल (Indian Premiere League) स्पर्धेला सुरुवात झाली असून आज लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) हे दोन्ही संघ भिडणार आहेत. आयपीएलमधील हा तिसरा सामना असणार आहे. तसंच दोन्ही संघाचा हा पहिला सामना असून तो जिंकण्याच्या हेतूनेच संघ मैदानात उतरतील. लखनऊ संघ घरच्या मैदानावर खेळणार असल्याने त्यांची जमेची बाजू आहे. 

लखनऊ संघाने गतवर्षीच डेब्यू केला आहे. के एल राहुलच्या नेतृत्वात संघाने प्लेऑफपर्यंत झेप घेतली होती. दुसरीकडे दिल्लीचा संघ गेल्या हंगामात फार चांगली कामगिरी करु शकला नव्हता. ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळलेला हा संघ पाचव्या स्थानावर राहिली होता. दरम्यान सध्या ऋषभ पंत जखमी असल्याने स्पर्धेबाहेर असून त्याच्या जागी डेव्हिड वॉर्नरकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. दोन्ही संघाची प्लेइंग 11 ठरली आहे, पण या आजचा ड्रीम 11 संघ काय असू शकतो त्याबद्दल जाणून घ्या...

आज अनेक मोठे खेळाडू एकमेकांविरोधात उभे असतील. दरम्यान दोन्ही संघ यष्टीरक्षक म्हणून कोणत्या खेळाडूला संधी देणार आहेत हे पाहावं लागणार आहे. अशा स्थितीत ड्रीम 11 संघ तयार करणं थोडं आव्हानात्मकच असणार आहे. यासाठी काही फँटन्सी टिप्स जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

लखनऊच्या मैदानावर सामना होणार असून ही खेळपट्टी थोडी धीम्या गतीची आहे. नुकताच भारत आणि न्यूझीलंडमध्ये या मैदानावर टी-20 सामना झाला होता. या सामन्यात संघ जास्त धावसंख्या उभारु शकले नव्हते. दरम्यान, फिरकी गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी मदत करणारी ठरु शकते. त्यामुळे ड्रीम 11 संघ तयार करताना या काही मुद्द्यांना लक्षात ठेवा. दरम्यान खेळाडू घेताना केएल राहुल, मिचेल मार्श, रोवमेन पॉवेल, निकोलस पूरन, अक्षर पटेल अशा खेळाडूंना घेण्याचा विचार नक्की करा. 

दोन्ही संघाचं संभाव्य प्लेइंग 11 कसं असेल?

लखनऊ सुपर जायंट्स - 

केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, काइल मेयर्स, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, मनन वोहरा, कृणाल पंड्या, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई, मार्क वुड.

दिल्ली कॅपिटल्स - 

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, मनीष पांडे, सरफराज खान (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, अमन खान, चेतन साकारिया/खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

Dream 11 संघ कसा असू शकतो?

फलंदाज: डेव्हिड वॉर्नर, केएल राहुल, रोवमन पॉवेल, दीपक हुडा

अष्टपैलू: मिचेल मार्श, अक्षर पटेल, मार्कस स्टॉइनिस

गोलंदाज: आवेश खान, कुलदीप यादव, रवी बिश्नोई

कर्णधार: केएल राहुल

उपकर्णधार: मिचेल मार्श

यष्टिरक्षक: निकोलस पूरन