IPL Mumbai Indians : आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. आतापर्यंतच्या आयपीएलच्या पंधरा हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आतापर्यंत सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा आयपीएलच्या ट्ऱॉफीवर नाव कोरलं आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) 2013 मध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. तेव्हापासून मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे.
आयपीएलच्या तोंडावर नवा वाद
आता सोळाव्या हंगामातही मुंबई इंडियन्स सहाव्या जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. पण त्यापूर्वीच मुंबई इंडियन्स संघाचा एक नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्सचा विकेटकिपर आणि स्टार फलंदाज ईशान किशनने (Ishan Kishan) आपल्या संघाचा कर्णधार रोहित शर्मावर गंभीर आरोप केला आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन ही जोडी मुंबई इंडियन्सची यशस्वी सलामी जोडी मानली जाते. गेल्या अनेक हंगामात या जोडीने मुंबईला दमदार सुरुवात करुन दिली आहे. या दोघांमध्ये चांगली बॉण्डिंग आहे. 2022 मध्ये डिसेंबर महिन्यात झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Auction) मुंबई इंडियन्सने ईशान किशनवर तब्बल 15.25 कोटी रुपयांची बोल लावून संघात घेतलं.
ईशान किशनचा रोहित शर्मावर आरोप
दरम्यान एका मुलाखतीत ईशान किशनने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मावर एक मोठा आरोप केला आहे. रोहित शर्मा मैदानावर शिवीगाळ करतो असं ईशान किशनने सांगितलं. रोहित शर्मा शांत स्वभावाचा आहे, पण मैदानावर संघातील एखाद्या खेळाडूने चुक केल्यास तो संतापतो आणि शिवीगाळ करतो असं ईशान किशनने म्हटलं आहे. पण सामना संपल्यानंतर तो त्या खेळाडूची माफीही मागतो. मैदानावर घडलेलं मनावर घेऊ नकोस असं तो त्या खेळाडूला समजवतो, असंही ईशानने म्हटलं आहे.
यावेळी ईशान किशनने स्वत:बरोबर घडलेला एक किस्साही सांगितला आहे. चेंडूची चमक घालवण्यासाठी तो जमिनीवर आपटला जोता. असंच एका सामन्यता आपण चेंडू जमिनीवर जोरात आपटला आणि रोहित शर्माच्या दिशेने फेकला. पण प्रकाराने रोहित संतापला आणि त्याने तो चेंडू उचलला आणि रुमालाने फुसला, पण त्यानंतर त्याने माझ्या दिशेने पाहून जोरदार शिवी दिली. पण सामना संपल्यानंतर सामन्यात असं होतं, मनावर घेऊ नकोस असंही रोहितने मला सांगितल्याचं ईशानने सांगितलं.
ईशान किशनने केलं रोहित शर्माचं कौतुक
रोहित शर्मा शिवीगाळ करत असला तरी त्याच्या कर्णधारपदाचं ईशान किशनने कौतुक केलं आहे. मैदानावर रोहित शर्मा खूप चाणाक्ष असल्याचं ईशान किशनने म्हटलं आहे. अत्यंत कठिण परिस्थितीतही रोहित शर्मा शांततेत निर्णय घेतो, तो जे निर्णय घेतो, ते शक्यतो चुकत नाहीत असंही ईशानने म्हटलं आहे.