IPL 2023 MI vs GT Playing 11: हार्दिक कि रोहित, फायनलचं तिकिट कोणाला मिळणार? थोड्याच वेळात टॉस

IPL 2023 मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सदरम्यान क्वालिफायर-2 चा सामना खेळवला जाईल. हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये धडक मारेल. फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सबरोबर जेतेपदासाठी चुरस रंगेल

राजीव कासले | Updated: May 26, 2023, 06:16 PM IST
IPL 2023 MI vs GT Playing 11: हार्दिक कि रोहित,  फायनलचं तिकिट कोणाला मिळणार? थोड्याच वेळात टॉस title=

IPL 2023 MI vs GT Playing 11: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL 2023)  सोळाव्या हंगामातील दुसरा क्वालिफायर सामना थोड्याचवेळात खेळवला जाणार आहे. पाचवेळा आयपीएल विजेती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गतविजेती गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आमने सामने असणार आहेत. थोड्याचवेळात म्हणजे संध्याकाळी 7.30 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळवला जाणार असून विजेता संघ थेट अंतिम फेरीत धडक मारेल.

क्वालिफाईंग राऊंडमध्ये गुजरात पराभूत
हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सला पहिल्या क्वालिफायर राऊंडमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 15 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. लीग सामन्यात गुजरातने नऊ सामने जिंकत पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं होतं. पण क्वालिफायर राऊंडमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागल्याने आता दुसरा क्वालिफायर राऊंड खेळवा लागणार आहेत. दुसरीकडे रोहित सेनेने एलिमिनेटर राऊंडमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) 81 धावांनी दणदणीत पराभव केला होता. 

गुजरातसमोर सूर्या आणि ग्रीनचं आव्हान
आयपीएलच्या या हंगामात मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीनने आपल्या आक्रमक फलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. तर गोलंदाजीत मुंबई इंडियन्सला आकाश मधवालच्या रुपात नवा मॅचविनर सापडला आहे. मधवालने गेल्या सामन्यात अवघ्या 5 धावात 5 विकेट घेत आयपीएलमधल्या सर्वोत्तम गोलंदाजीचा रेकॉर्ड केला. मुंबई इंडियन्सचा या हंगामातील प्रवास चढ-उताराचा राहिला आहे. पण आता मुंबईची गाडी सुसाट सुटली आहे. इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमेरुन ग्रीन, टिम डेव्हिड हे फलंदाज जबरस्त फॉर्मात आहेत. 

मुंबईसमोर गिलचं आव्हान
गुजरात संघाबद्दल बोलायचं झालं तर मुंबईसमोर प्रमुक आव्हान असले तर गुजरातचा सलामीचा फलंदाज शुभमन गिलचं. या हंगामात गिल भलत्याच लयीत आहे. प्रत्येक सामन्यात गीलची बॅट तळपतेय. बंगलोरविरुद्ध गीलने शतक ठोकत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. याशिवाय गोलंदाजीत मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि राशिद खानचा सामना करणं प्रत्येक संघाल कठिण होऊन बसलं आहे. याशिवाय नूर अहमदची फिरकीही फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरतेय. 

गिलने या हंगामात 15 सामन्यात तब्बल 722 धावा केल्या आहेत. सर्वाधिर धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गील दुसऱ्या क्रमांकावर असून ऑरेंज कॅप पटकावण्यासाठी त्याला केवळ 8 धावांची गरज आहे. पहिल्या स्थानावर आरसीबीचा कर्णधार फाप डुप्लेसिस आहे. 

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग-11
ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमरन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, नेहाल वढेरा, क्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल

गुजरात टायटन्सची  संभाव्य प्लेइंग-11
शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, मोहित शर्मा (इम्पॅक्ट प्लेयर), डेविड मिलर, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, यश दयाल आणि मोहम्मद शमी.