आयपीएलमध्ये चेन्नईसाठी 'कही खुशी कही गम' स्टार खेळाडू बाहेर, घातक गोलंदाजाची एन्ट्री

IPL 2024 : इंडियन प्रीमीअर लीग ऐन रंगात असतानाच चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा स्टार गोलंदाज दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामात खेळू शकणार नाही. त्याच्या बदल्यात चेन्नईमध्ये वेगवान गोलंदाजांची एन्ट्री झाली आहे. 

राजीव कासले | Updated: Apr 18, 2024, 04:22 PM IST
आयपीएलमध्ये चेन्नईसाठी 'कही खुशी कही गम' स्टार खेळाडू बाहेर, घातक गोलंदाजाची एन्ट्री title=

Devon Conway Ruled Out : आयपीएल 2024 ऐन रंगात असतानाच चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या गेल्या हंगमात चेन्नईसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू दुखापतमीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. अंगठ्याच्या दुखापतीमुळे डेवोन कॉनवे (Devon Conway) आयपीएलचा उर्वरित हंगााम खेळू शकणार नाहीए. कॉनवेच्या जागी चेन्नईच्या संघात वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनचा (Richard Gleeson) संघात समावेश करण्यात आला आहे. रिचर्डला त्याची बेस प्राईज 50 लाख रुपयांना खरेदी करण्यात आलंय. 

कॉनवेची आयपीएल कारकिर्द
आयपीएल 2023 मध्ये डेवॉन कॉनवेने दमदार कामगिरी केली होती. चेन्नईकडून खेळताना कॉनवेने 16 सामन्यात 672 धावा केल्या होत्या. यात 6 अर्धशतकांचा समावेश होता. गेल्या हंगात गुजरात टायटन्सविरोधात अंतिम सामन्यात 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत चेन्नईला पाचव्यांदा चॅम्पियन बनवलं होतं. कॉनवेच्या जाण्याने चेन्नईच्या टॉप ऑर्डरला धक्का बसणार आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड संघाला चांगली सुरुवात करुन देतोय, पण कॉनवेसारखा सातत्यापूर्ण धावा करणारा खेळाडू संघात नाहीए. अंगठ्याच्या दुखापतीमुळे कॉनवे यंदाच्या हंगामात एकही सामना खेळू शकला नाही. 

कोण आहे रिचर्ड ग्लीसन
कॉनवेच्या जागी रिचर्ड ग्लीसनला चेन्नईनं संधी दिली आहे. रिचर्ड ग्लीसनने 2022 मध्ये भारताविरुद्ध आंतराराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ग्लीसन इंग्लंडसाठी आतापर्यंत 6 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यात त्याच्या नावावर 9 विकेट जमा आहेत. ग्लीसनाल आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नसला तरी तो फ्रँचाईजीसाठी भरपूर क्रिकेट खेळला आहे. बिग बॅश लीग आणि बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये ग्लीसनने दमदार कामगिरी केली आहे. आता त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. 

चेन्नईची आयपीएलमधली कामगिरी
तब्बल पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईने यंदाच्या हंगामातही दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवलाय. चेन्नईच्या खात्यात 8 पॉईंट जमा असून आयपीएल पॉईंटटेबलमध्ये चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे. शेवटच्या सामन्यात चेन्नईने चुरशीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. या सामन्यात चेन्नईच्या एमएस धोनीने शेवटच्या षटकातील चार चेंडूत 20 धावा केल्या होत्या. यात सलग तीन षटकार लगावले होते. चेन्नईच्या विजयात याच 20 धावा निर्णायक ठरल्या होत्या.

चेन्नई सुपर किंग्सचा पुढचा सामना 19 एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्सशी रंगणार आहे.