Video : 'याच्या डोक्यात फक्त...' भर मैदानात रोहित शर्मा असं काही बोलला की ईशान किशनही वळून पाहू लागला

IPL 2024 : तो रोहित आहे.... तो यासाठीच ओळखला जातो...; आयपीएलमधील नवा व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिला का? रोहित शर्मा कोणाबद्दल बोलतोय काही कळलं?   

सायली पाटील | Updated: Apr 12, 2024, 11:27 AM IST
Video : 'याच्या डोक्यात फक्त...' भर मैदानात रोहित शर्मा असं काही बोलला की ईशान किशनही वळून पाहू लागला title=
ipl 2024 Mumbai indians Rohit Sharmas Hilarious Banter With Dinesh Karthik Goes Viral watch video

IPL 2024 : यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माला मुंबईच्या संघाच्या कर्णधारपदी पाहायला मिळणार नसल्यामुळं अनेक क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला. पण, आता मात्र मैदानावरील रोहितच्या निश्चिंत वावरण्यामुळं अनेकांचाच उत्साह परतताना दिसत आहे. यंदाचा आयपीएल हंगाम मुंबईच्या संघासाठी सुरुवातीपासूनच काहीसा कमी-जास्त उत्साहाचा ठरला. ज्यानंतर आता कुठं या संघाला सूर गवसताना दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या सामन्यादरम्यान हेच चित्र पाहायला मिळालं. यावेळी रोहित शर्मासुद्धा ज्या गोष्टीसाठी सहसा चर्चेत असतो तीच गंमतही करताना दिसला. 

क्रिकेट सामन्यांदरम्यान (Rohit Sharma) रोहितचा खोडकरपणा लपून राहिलेला नाही. आजवर बऱ्याच सामन्यांमध्ये त्याच्या या शैलीनं खऱ्या अर्थानं क्रिकटप्रेमींचं मनोरंजन केलं. हाच रोहित बंगळुरूविरोधातील सामन्यातही कमाल करून गेला. ज्यानंतर त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. भर सामन्यात रोहित असं काही बोलून गेला की, तिथं असणारा (Ishan Kishan) ईशान किशनही दोन मिनिटं मिश्किलपणे हसत त्याच्याकडे पाहतच राहिला. 

बंगळुरूच्या संघातील 38 वर्षीय खेळाडू दिनेश कार्तिक यानं जेव्हा मुंबईच्या गोलंदाजांचा प्रत्येक चेंडू मोठ्या ताकदीनं मारण्यास सुरुवात केली तेव्हा रोहित हळूच त्याच्या काहीसा जवळ आला आणि त्यालाही ऐकायला जाईल अशाच आवाजात बरंच काही बोलून गेला, अर्थात तेसुद्धा विनोदी अंदाजात. 

हेसुद्धा वाचा : अ‍ॅपलकडून iPhone युजर्सना सावधगिरीचा इशारा; तुम्हालाही 'हे' नोटिफिकेशन आलंय? 

23 चेंडूंवर 53 धावांची दमदार खेळी खेळणाऱ्या (Dinesh Kartik) दिनेश कार्तिकनं मुंबईच्या गोलंदाजांची दमछाक केली. आकाश मधवालच्या एका षटकत तर त्यानं 4 चौकार ठोकले, बरं त्याचे हे चारही चौकार थर्ड मॅनच्या मधूनच निघाले आणि त्याची ही फटकेबाजी पाहून रोहित शर्मा तिथं आला आणि म्हणू लागला... 'वर्ल्डकपमध्ये निवड होण्यासाठी याला प्रोत्साहन द्याचंयय. वर्ल्डकप चाललाय, वर्ल्डकप चाललाय याच्या डोक्यात... डीके.. शाबास... अजून वर्ल्डकप खेळायचाय'. (वर्ल्ड कप सेलेक्शन के लिए पुश करना है इसको. वर्ल्ड कप चल रहा है, वर्ल्ड कप दिमाग में इसके. शाबाश डीके, वर्ल्ड कप खेलना है अभी..)

रोहित शर्मानं हे असं काहीतरी विनोदी वक्तव्य करण्यास सुरुवात केली आणि त्याचं बोलणं ऐकून ईशान किनशनलाही हसू आवरता आलं नाही. बरं, इथं रोहित चुकीचं काहीच बोलला नाही, कारण मागील टी20 वर्ल्ड कपमध्येही दिनेश कार्तिकनं त्याच्या आयपीएलमधील कामगिरीच्या बळावरच स्थान मिळवलं होतं. तेव्हा आता यंदासुद्धा तो त्याच अंदाजाच आयपीएल गाजवण्याच्या तयारीतच आल्याचं त्याचा एकंदर खेळ पाहून स्पष्ट होत आहे.