SRH vs RR Qualifier 2: चेन्नईचं पीच फलंदाज की गोलंदाज कोणाला ठरणार फायदेशीर? पाहा रिपोर्ट

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Pitch Report: आतापर्यंत आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने खेळले गेलेत. यापैकी हैदराबादच्या टीमने आतापर्यंत 10 सामने जिंकलेत, तर राजस्थानने आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

सुरभि जगदीश | Updated: May 24, 2024, 11:41 AM IST
SRH vs RR Qualifier 2: चेन्नईचं पीच फलंदाज की गोलंदाज कोणाला ठरणार फायदेशीर? पाहा रिपोर्ट  title=

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Pitch Report: आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये आज दुसरा क्वालिफायर सामना रंगणार आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नईमध्ये होणार आहे. हा सामन्यात जी टीम बाजी मारेल ती थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्रवारी चेन्नईची खेळपट्टी कशी असणार आहे, हे पाहूयात.

दोन्ही टीमचे हेड टू हेड

आतापर्यंत आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने खेळले गेलेत. यापैकी हैदराबादच्या टीमने आतापर्यंत 10 सामने जिंकलेत, तर राजस्थानने आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे इतिहासात सनरायझर्स हैदराबादचं पारड जड असल्याचं दिसून येतंय. तसंच यावर्षी या दोन टीममध्ये एक सामना झाला, जो हैदराबाद टीमने जिंकला. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार हे पाहावं लागणार आहे.

चिदंबरम स्टेडियमचा पीच रिपोर्ट 

चेन्नईची एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी स्पिनिर्सना अनुकूल असल्याचं मानलं जातं. परंतु फलंदाजांना रन्स काढताच येणार नाही अशी स्थिती नाही. कौशल्य दाखवून काळजीपूर्वक खेळ केल्यास त्यांना रन्स करण्याच्या भरपूर संधी मिळतील. मात्र या पीचवर फलंदाजांना स्पिनर्सपासून सावध रहावं लागणार आहे. अंदाजानुसार, पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 164 असू शकते, तर दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या 151 असण्याची शक्यता आहे.

सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश कुमार रेड्डी, शाहबाज अहमद, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स ( कर्णधार ), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.

राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन ( कर्णधार आणि विकेटकीपर ), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.