IPL Mega Auction 2022 | पहिल्या दिवशी विकल्या गेलेल्या, न विकल्या गेलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

IPL Mega Auction 2022 च्या पहिल्या दिवशी अनेक खेळाडू विकले गेले आहेत. ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंमध्ये इशान किशनवर सर्वात मोठी बोली लागली आहे.

Updated: Feb 12, 2022, 09:33 PM IST
IPL Mega Auction 2022 | पहिल्या दिवशी विकल्या गेलेल्या, न विकल्या गेलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी title=

बंगळुरु : IPL Mega Auction 2022 मध्ये आज अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागली. बेस प्राईज पेक्षा अधिक पटीने अनेकांवर बोली लावली गेली. ज्यामध्ये इशान किशन, श्रेयस अय्यर, रबाडा यांचा समावेश आहे. 

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याला पंजाब किंग्जने 9.25 कोटी रुपयांना खरेदी केले. भारतीय खेळाडूंवर काही मोठ्या बोली लागल्या होत्या आणि शिखर धवनवर पंजाब किंग्जकडून 8.25 कोटी रुपयांनी बोली लागली.

मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांची बोली लावत भारताचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला खरेदी केले. आयपीएल 2022 च्या लिलावात तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. याआधी, श्रेयस अय्यरवर मोठी बोली लागली होती. 

कोलकाता नाईट रायडर्सने लिलावात तिच्यावर 12.25 कोटी रुपयांची बोली लावली होती.

IPL 2022 लिलावात बोली लागलेल्या खेळाडूंची किंमत 

शिखर धवन- पंजाब किंग्स - 8.25 कोटी रुपये
रविचंद्रन अश्विन – राजस्थान रॉयल्स - 5 कोटी रुपये
पॅट कमिन्स – कोलकाता नाइट रायडर्स - 7.25 कोटी
कागिसो रबाडा – पंजाब किंग्स - 9.25 कोटी रुपये
ट्रेंट बोल्ट – राजस्थान रॉयल्स - 8 कोटी रुपये
श्रेयस अय्यर - कोलकाता नाईट रायडर्स - 12.25 कोटी
मोहम्मद शमी – गुजरात टायटन्स - 6.25 कोटी
फाफ डु प्लेसिस – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 7 कोटी रुपये
क्विंटन डी कॉक - लखनौ सुपर जायंट्स - 6.75 कोटी रुपये
डेव्हिड वॉर्नर – दिल्ली कॅपिटल्स - 6.25 कोटी रुपये
मनीष पांडे – लखनौ सुपर जायंट्स - 4.60 कोटी रुपये
शिमरॉन हेटमायर – राजस्थान रॉयल्स - 8.50 कोटी रुपये
रॉबिन उथप्पा – चेन्नई सुपर किंग्स - 2 कोटी रुपये
जेसन रॉय – गुजरात टायटन्स - 2 कोटी रुपये
देवदत्त पडिक्कल – राजस्थान रॉयल्स - 7.75 कोटी रुपये
ड्वेन ब्राव्हो – चेन्नई सुपर किंग्स - 4.40 कोटी रुपये
नितीश राणा – कोलकाता नाईट रायडर्स - 8 कोटी रुपये
जेसन होल्डर - लखनौ सुपर जायंट्स - 8.75 कोटी
हर्षल पटेल – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - 10.75 कोटी
दीपक हुडा - लखनौ सुपर जायंट्स - 5.75 कोटी
वानिंदू हसरंगा - रॉयल चॅलेंजर्स बंगळुर - रु. 10.75 कोटी
वॉशिंग्टन सुंदर – सनरायझर्स हैदराबाद - 8.75 कोटी रुपये
कृणाल पांड्या – लखनौ सुपर जायंट्स – रु 8.25 कोटी
मिचेल मार्श – दिल्ली कॅपिटल्स - 6.50 कोटी रुपये
अंबाती रायुडू – चेन्नई सुपर किंग्स – 6.75 कोटी रुपये
इशान किशन – मुंबई इंडियन्स - 15.25 कोटी रुपये
जॉनी बेअरस्टो – पंजाब किंग्स - 6.75 कोटी रुपये
दिनेश कार्तिक – रॉयल चॅलेंजर्स बंगळुर - 5.50 कोटी रुपये
निकोलस पूरन – सनरायझर्स हैदराबाद - 10.75 कोटी रुपये
टी नटराजन – सनरायझर्स हैदराबाद - 4 कोटी रुपये
दीपक चहर – चेन्नई सुपर किंग्ज - 14 कोटी रुपये
प्रसिध कृष्णा – राजस्थान रॉयल्स - 10 कोटी रुपये
लॉकी फर्ग्युसन – गुजरात टायटन्स - 10 कोटी रुपये
जोश हेझलवूड – रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु - 7.75 कोटी रुपये
मार्क वुड - लखनौ सुपर जायंट्स - 7.50 कोटी
भुवनेश्वर कुमार – सनरायझर्स हैदराबाद - 4.20 कोटी रुपये
शार्दुल ठाकूर – दिल्ली कॅपिटल्स - 10.75 कोटी
मुस्तफिजुर रहमान – दिल्ली कॅपिटल्स - 2 कोटी रुपये
कुलदीप यादव – दिल्ली कॅपिटल्स - 2 कोटी रुपये
युझवेंद्र चहल- राजस्थान रॉयल्स- 6.50 कोटी
प्रियम गर्ग - सनरायझर्स हैदराबाद - 20 लाख रुपये
अभिनव सदरंगानी - गुजरात टायटन्स - रु. 2.60 कोटी
डेवाल्ड ब्रेविस – मुंबई इंडियन्स - 3 कोटी रुपये
अश्विन हेब्बर – दिल्ली कॅपिटल्स - 20 लाख रुपये
राहुल त्रिपाठी – सनरायझर्स हैदराबाद - 8.50 कोटी रुपये
रियान पराग – राजस्थान रॉयल्स - 3.80 कोटी रुपये
अभिषेक शर्मा – सनरायझर्स हैदराबाद - 6.50 कोटी रुपये
सरफराज खान – दिल्ली कॅपिटल्स - 20 लाख रुपये
शाहरुख खान – पंजाब किंग्स - 9 कोटी रुपये

IPL 2022 लिलावात न विकल्या गेलेल्या खेळाडूंची यादी:

डेव्हिड मिलर
सुरेश रैना
स्टीव्ह स्मिथ
शाकिब अल हसन
मोहम्मद नबी
मॅथ्यू वेड
वृद्धिमान साहा
सॅम बिलिंग्ज
उमेश यादव
आदिल रशीद
मुजीब झद्रान
इम्रान ताहिर
अॅडम झाम्पा
अमित मिश्रा
रजत पाटीदार
सी हरी निशांत
अनमोलप्रीत सिंग