मुंबई : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या अकराव्या सिझनचा लिलाव आताच संपला. यावर्षी हा लिलाव चर्चेत होता, खेळाडूंच्या खरेदीचा मोठा आकडा कोट्यवधींच्या पुढे गेला आहे.
टीम कोट्यवधी रूपयात खेळाडू आपल्या टीममधून खेळवून, डाव टाकतायत. भारतीय खेळाडूंपासून सर्वच खेळाडूंना वाटतं की आपल्या टीम मालकाला आपण खूप काही कमवून देऊ.
आठ क्रिकेट टीम्स ४७ दिवसात क्रिकेट प्रेमींकडून भरपूर मनोरंजन करून घेणार आहेत, तर दुसरीकडे खेळाडूंवर खर्च करणाऱ्या फ्रेंचायझी करोडो रूपयांची कमाई देखील करून घेणार आहेत.
केवळ १० दिवसात आयपीएलची किंमत शून्यावरून हजारो करोड रूपयांपर्यंत पोहोचली. मागील वर्षी आयपीएलच्या ब्रॅण़्ड व्हॅल्यू मोठ्या प्रमाणात उंचावला. मागील वर्षी आयपीएलची ब्रॅण़्ड व्हॅल्यू होती २७ हजार कोटी तर या वर्षी ती जाऊन पोहोचली आहे, ३४ हजार कोटींवर, फ्रेचायझीची व्हॅल्यू २०१७ मध्ये ३४ टक्क्यांनी वाढली आहे.
यामुळे आयपीएलमध्ये यावर्षी खेळाडूंनाही चांगली किंमत मिळत आहे, तसेच टीम मालकांनाही चांगली कमावण्याची संधी आहे.