IPL: मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी वडिलांनी सोडली पोलीसची नोकरी, आता या संघाचा कर्णधार

मुलाला यशस्वी क्रिकेटर बनवण्यासाठी वडिलांना केला होता नोकरीचा त्याग

Updated: Apr 7, 2021, 11:54 PM IST
IPL: मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी वडिलांनी सोडली पोलीसची नोकरी, आता या संघाचा कर्णधार

IPL 2021 : भारतीय विकेटकीपर आणि फलंदाज संजू सॅमसन या वर्षी आयपीएल IPL 2021 मध्ये पहिल्यांदाच कर्णधार म्हणून दिसणार आहे. राजस्थान रॉयल्सने यावर्षी स्टीव्ह स्मिथला संघातून रिलीज करुन संजू सॅमसनकडे संघाची जबाबदारी सोपवली आहे. 26 वर्षाचा खेळाडू संजू सॅमसनने टीम इंडियासाठी 7 टी-20 सामने खेळले आहे. त्याची कामगिरी साधारण होती. पण ऋषभ पंतच्या समोर त्याची चमक कमी झाली.

संजू सॅमसनने 7 टी-20 सामन्यांमध्ये 11.86 च्या रनरेटने 83 रन केले आहेत. पण आयपीएलमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. संजू सॅमसनने आयपीएलमध्ये 107 सामन्यांमध्ये 27.78 च्या रनरेटने 2584 रन केले आहेत. संजू सॅमसनचा बेस्ट स्कोर 102 रन आहे. त्याने आयपीएलमध्ये 2 वेळा शतक ठोकलं आहे. तर 13 वेळा अर्धशतक ठोकले आहे.

संजू सॅमसनला क्रिकेटर बनवण्यासाठी त्याचे वडील विश्वनाथ सॅमसन यांनी खुप मेहनत घेतली होती. विश्वनाथ सॅमसन यांनी त्यांची पोलीसची नोकरी देखील सोडली होती. संजू सॅमसनला भारतीय संघात जास्त संधी मिळाली नाही. पण आयपीएलमध्ये तो आपल्या कामगिरीने संघात स्थान मिळवण्याचा नक्की प्रयत्न करताना दिसेल.