मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठीचा (Ipl 2022) 2 दिवसीय मेगा ऑक्शन (Ipl Mega Auction 2022) पार पडला. या ऑक्शनमध्ये अनेक युवा खेळाडू हे मालमाल झाले. त्यांच्यावर कोटीची बोली लावण्यात आली. मात्र या लिलावात अनुभवी आणि स्टार खेळाडूंकडे फ्रँचाईंजीकडून दुर्लक्ष करण्यात आलं. अनेक अनुभवी खेळाडू हे अनसोल्ड राहिले. यामध्ये सुरेश रैना या आणि यासारख्या अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. (ipl mega auction 2022 all rounder shakib al hasan wife share facebook post after her husband unsold)
असाच एक स्टार अनुभवी ऑलराऊंडर अनसोल्ड राहिला. आपला पती अनसोल्ड का राहिला, याबाबतचा खुलासा या स्टार खेळाडूच्या पत्नीने केला आहे. बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शाकिब अल हसनच्या (Shakib Al Hasan) पत्नीने (Shakib Al Hasan Wife) एक फेसबूक पोस्ट केली आहे. यामध्ये तिने त्याच्या पतीला (Umeey Al Hasan) फ्रँचाईजीने खरेदी का केलं नाही, या मागील कारण सांगितलं आहे.
फेसबूक पोस्टमध्ये काय म्हटलंय?
"तुम्ही खूप अतिउत्साही होण्याआधी, याआधी तुम्हाला सांगू इच्छिते की, आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी उपलब्ध आहेत की नाही, हे विचारण्यासाठी अनेक फ्रँचाईंजींनी थेट संपर्क केला होता. मात्र दुर्देवाने असं होऊ शकलं नाही. कारण बांगलादेश श्रीलंके विरुद्ध सीरिज खेळणार आहे. याच कारणामुळे कोणत्याही फ्रँचायजीने त्याला खरेदी केलं नाही", असं शाकिबच्या पत्तीने फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"लिलावात खरेदी केलं जाणं ही मोठी बाब नाही, हा काही शेवट नाही. पुढील वर्षातही ही संधी असेल. शाकिबची निवड झाली असती, तर त्याला श्रीलंका विरुद्धच्या मालिकेला मुकावं लागलं असतं, त्यामुळे त्याची जर निवड झाली असती, तर तेव्हाही असंच म्हटलं असतं का? देशाला प्रथम प्राधान्य न देता बाहेरच्या स्पर्धेत खेळताय", असा सवालही शाकिबच्या पत्तीने या निमित्ताने उपस्थित केला.
शाकिबची आयपीएल कारकिर्द
शाकिबने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 71 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 63 विकेट्स घेतल्या आहेत. शाकिब हा टॉप ऑलराऊंडर खेळाडूंपैकी एक आहे. तसंच शाकिब हा टी 20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.