IND vs WI : रोहित शर्माचा पहिल्याच टी 20 सामन्यासाठी मास्टरप्लॅन, नव्या युवा खेळाडूला संधी

टीम इंडिया पुन्हा एकदा टी 20 सीरिजमध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

Updated: Feb 16, 2022, 06:44 PM IST
IND vs WI : रोहित शर्माचा पहिल्याच टी 20 सामन्यासाठी मास्टरप्लॅन, नव्या युवा खेळाडूला संधी  title=

मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला टी 20 सामना आज होत आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन इथे हा सामना होत आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. पहिल्यांदा टीम इंडियाने क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया पुन्हा एकदा टी 20 सीरिजमध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

या सामन्यामध्ये रवी बिश्नोईला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे. रवी बिश्नोईवर मॅनेजमेंटनं मोठा विश्वास दाखवला आहे. सिनियर टीम इंडियामध्ये खेळणारा रवि बिश्नोई हा 2020 च्या अंडर 19 टीममधील पहिलाच खेळाडू ठरला आहे. 

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, दीपक चहर, एच पटेल, बी कुमार, युजवेंद्र चहल, आर बिश्नोई 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x