नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२० (आयपीएल २०२०) एका आठवड्यात सुरू होणार आहे. दरम्यान, आयपीएलच्या 12 वर्षांच्या इतिहासात फलंदाजांच्या माध्यमातून अनेक मोठे पराक्रम पाहिले गेले. आयपीएलच्या काळात अनेक खेळाडूंनी सर्वाधिक वेळा १५ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारले आहेत.
५. केरोन पोलार्ड
वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू केरोन पोलार्ड याला आयपीएलमध्ये सिक्स मारताना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सूक असतात. आयपीएलमध्ये पोलार्डने आपल्या फलंदाजीची शानदार छाप सोडली आहे. आयपीएलमध्ये पोलार्डने एका सीजनमध्ये १५ किंवा त्या पेक्षा अधिक सिक्स ठोकण्याचा विक्रम ७ वेळा केला आहे. त्याने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 176 षटकार ठोकले आहेत.
4- एबी डिव्हिलियर्स
दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने देखील आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. म्हणूनच त्याला मिस्टर 360 म्हणून देखील म्हटलं जातं. आयपीएलमध्ये एबीने देखील अनेक सिक्स ठोकले आहेत. त्याने ८ वेळा १५ हून अधिक षटकार ठोकले आहेत. तर एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत 212 सिक्स ठोकले आहेत.
3- ख्रिस गेल
कॅरेबियन फलंदाज ख्रिस गेल त्याच्या तुफानी खेळासाठी युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखला जातो. टी-20 क्रिकेटमध्ये लवकरच 1000 सिक्सचा आकडा गाठणारा गेल याने आयपीएलच्या हंगामात 8 पेक्षा जास्त वेळा 15 षटकार ठोकले आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये 326 षटकार मारणारा ख्रिस गेल एकमेव फलंदाज आहे.
2- सुरेश रैना
मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलच्या एका मोसमात ८ वेळा १५ हून अधिक षटकार लगावले आहेत. रैनाने आयपीएलमध्ये १९४ षटकार लगावले आहेत.
1- महेंद्रसिंग धोनी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानावर मोठे मोठे सिक्स मारण्याची क्षमता ठेवतो. आयपीएलच्या मोसमात 8 वेळा 15 किंवा अधिक षटकार त्याने ठोकले आहेत. दुसरीकडे, आयपीएलच्या इतिहासात माही एकमेव भारतीय खेळाडू आहे, ज्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.
- एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीने समान कामगिरी केली आहे. पण या सर्व खेळाडूंचे सामने आणि इनिंगमध्ये फरक आहे.