IPL Trophy Sanskrit shloka: आयपीएल 2023 ( IPL 2023 ) आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आज आयपीएलचा ( IPL 2023 ) फायनल सामना खेळवण्यात येतोय. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना अजून सुरु झालेला नाही. यावेळी विजेता कोण ठरणार आणि आयपीएलची ट्रॉफी ( IPL Trophy ) कोणत्या टीमच्या कर्णधाराच्या हाती जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तुम्ही कधी पाहिलंय का, आयपीएलच्या या ट्रॉफीवर ( IPL Trophy ) खास संस्कृतमध्ये ( Sanskrit shloka ) एक मेसेज लिहीलेला असतो.
आजच्या सामन्यात जो जिंकणार त्याला आयपीएलची चमकणारी ट्रॉफी देण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याकडे ( Hardik Pandya ) ही ट्रॉफी देण्यात येईल की 4 वेळा विजयी असलेल्या महेंद्र सिंग धोनीच्या ( MS Dhoni ) हाती जाणार, हे पहावं लागणार आहे. अशातच या ट्रॉफीवर लिहिलेला खास मेसेज तुम्ही पाहिलाय का? या मेसेजमध्ये 'यात्रा प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि' असं लिहिण्यात आलेलं आहे.
‘यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि’ संस्कृतमध्ये लिहिलेल्या या शब्दांचा अर्थ असा आहे की, प्रतिभा आणि संधी एकत्र ठिकाणी. संस्कृत भाषेत लिहिलेल्या या श्लोकाच्या अर्थाप्रमाणे, आयपीएलने टीम इंडियाला अनेक प्रतिभावान खेळाडू दिले आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) विरूद्ध गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यामध्ये पावसाने खेळ केलाय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ( Narendra Modi Stadium ) पावसाने पु्न्हा एकदा व्यत्यय आणला आहे. यामुळे वेळेत सामना सुरु होऊ शकला नाही. पाऊस थांबला नसल्याने टॉसही होऊ शकलेला नाही. यामुळे आता ओव्हर्समध्ये कटिंगही होणार आहे.
दरम्यान काही वेळापूर्वी हवामान स्वच्छ झालं होतं. त्यानंतर कव्हर्स काढून टाकण्यात आले. याचशिवाय मैदान आणि खेळपट्टी कोरडे करण्याचे काम सुरू झालं होतं. मात्र अशातच पुन्हा एकदा आता पावसाने त्याचा खेळ सुरु केला. दोन्ही टीमचे खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.