CSK vs GT IPL 2023 Final : चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) विरूद्ध गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यामध्ये पावसाने खेळ केलाय. अहमबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium ) मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे टॉसलाही उशीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान चाहत्यांना आता अशा प्रश्न आहे की, रिझर्व डेच्या दिवशी सामना रद्द झाला तर काय होईल?
जर पावसामुळे आज म्हणजेच रविवारी सामना झाला नाही तर तर उद्याचा म्हणजेच सोमवारचा रिझर्व डे असणार आहे. सोमवारी म्हणजेच 29 मे रोजी सामना खेळवला जाईल. याबाबत स्टार स्पोर्टने माहिती स्टार स्पोटर्सने दिली आहे.
चाहत्यांच्या मनात हा प्रश्न आहे की, रिझर्व्ह डे च्या दिवशी जरी पावसाने व्यत्यय आणला, तर कोणत्या टीमला विजयी घोषित करणार? दरन्यान बीसीसीआयने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवला आहे. असातच जर उद्याचा सामनाही पावसाने वाया गेला दोन्ही टीम्सच्या कर्णधारांकडे आयपीएल ट्रॉफी सुपूर्द करण्यात येईल. म्हणजे आयपीएलमध्ये ट्रॉफी वाटून देण्यात येणार असून चेन्नई आणि गुजरात यांना संयुक्त विजेते घोषित केलं जाईल, असा उल्लेख एका ट्विटमध्ये करण्यात आलाय. दरम्यान याबाबत अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
If Rain doesn't stop then there is a reserve day tomorrow and if the match doesn't happen tomorrow then the Trophy will be shared . pic.twitter.com/8IQgTAUFmH
— Johns. (@CricCrazyJohns) May 28, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. जर सामना 9:35 वाजता सुरू झाला, तर पूर्ण ओव्हर्स म्हणजे 20 ओव्हर्स फेकण्यात येतील. दरम्यान पाऊस त्यानंतरही थांबण्याचं नाव घेत नसेल तर ओव्हर कमी करण्यास सुरुवात केली जाईल.
यानंतर रात्री 12.06 पर्यंत 5 ओव्हर्सचा सामना झाला नाही तर सामना राखीव दिवशी पूर्ण कऱण्यात येईल. रविवारी सामना न झाल्यास सोमवारी पुन्हा सामना खेळवला जाईल.