नवी दिल्ली : चेन्नई आणि मुंबईतील सामना थोड्या वेळात सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये मुंबईचा संघ सलग हरतोय. कोणत्याही परिस्थीतीत मुंबईला आजचा सामना जिंकावा लागेल. दरम्यान रोहित शर्माला या मॅचमध्ये रेकॉर्ड बनविण्याची संधी आहे. रोहित शर्माला आशियातील पहिला खेळाडू बनण्याची संधी आहे. जर रोहित शर्माने या सामन्यात ३ सिक्स मारले तर तो टी २० क्रिकेटमध्ये ३०० सिक्स पूर्ण करणार आहे. असं करणारा तो आशियात पहिला आणि जगातील ७ वा खेळाडू ठरणार आहे. मुंबईच्या या दिग्गज खेळाडूने आतापर्यंत १७९ सिक्स मारले आहेत. रोहित आधी डेविड वॉर्नर, शेन वॉर्नर, ब्रॅंडम मॅक्युलम, किरोन पोलार्ड आणि ख्रिस गेल यांनी हा कारनामा केलाय. रोहित शर्माने ६ मॅचमध्ये १४० रन्स बनविले आहेत. ९४ हा त्याचा सर्वाधिक स्कोर राहिलाय. आतापर्यंत तरी रोहितसाठी हा सीझन खास राहिला नाही. पण चेन्नईविरुद्ध च्याची सरासरी ठिक राहिली आहे. आता या मॅचमध्ये तो कसा खेळतो हे पाहणं औत्सुक्याच ठरेल.
आयपीएलच्या या सीझनमध्ये मुंबईच प्रदर्शन वाईट झालय. आधीच्या मॅचमध्ये हैदराबादविरुद्ध ३१रन्सने हार खावी लागली. तसेच राजस्थान आणि दिल्लीच्या संघानेही मुंबईला हारवलं. सीझनच्या सुरूवातीला चेन्नईकडून हारल्यानंतर मुंबईचा संघ पुन्हा एकदा चेन्नईला भिडणार आहे.