22 वर्षांच्या गोलंदाजानं धोनीलाही संभ्रमात टाकलं; एकाच चेंडूत केलं 'बोल्ड', व्हिडीओ व्हायरल

अवघ्या 22 व्या वर्षातही या गोलंदाजाचे विक्रम पाहून व्हाल थक्क.

Updated: Mar 18, 2021, 12:47 PM IST
22 वर्षांच्या गोलंदाजानं धोनीलाही संभ्रमात टाकलं; एकाच चेंडूत केलं 'बोल्ड', व्हिडीओ व्हायरल  title=

चेन्नई: IPL 2021 साठी CSK संघाची जोरदार तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी माहीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये माही तयारी करताना दिसत होता. तर आता धोनीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गोलंदाजानं टाकलेल्या चेंडूवर चकवा लागला आणि माही आऊट झाल्याचं दिसत आहे. 

या वेगवान गोलंदाजाचं नाव हरिशंकर रेड्डी आहे. त्याच्या चेंडूसमोर भलेभले खेळाडूही बोल्ड आऊट होतात आणि तंबूत परतात. चेन्नई सुपर किंग्सच्या सराव शिबिरादरम्यान हरिशंकर रेड्डीने महेंद्रसिंग धोनीला चकमा देऊन त्याला आऊट केलं.

हा व्हिडीओ पाहिला तर आपल्या लक्षात येईल वेगवान गोलंदाज हरीशंकर रेड्डीच्या वेगवान गोलंदाजीवर धोनी देखील कसा आऊट होतो ते दिसत आहे. धोनीला हरिशंकर रेड्डीनं फेकलेला चेंडू एक क्षण समजलाच नाही त्यामुळे धोनीला संभ्रम निर्माण झाला आणि तो काही कळायच्या आत आऊट देखील झाला. 

हरिशंकरचं रेकॉर्ड

22 व्या वर्षात हरिशंकरची गोलंदाजी पाहून सर्वांना आश्चर्य वाटले, विशेष म्हणजे महेंद्रसिंग धोनीलाही त्याने आऊट केलं. वेगवान गोलंदाज हरिशंकर रेड्डी विजय हजारे ट्रॉफी आणि आंध्र प्रदेशकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळला आहे. हरिशंकर रेड्डीने 5 लिस्ट ए सामन्यांत 8 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर 13 टी -20 सामन्यांत त्याने 19 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल 2021 च्या लिलावात हरिशंकर रेड्डीला चेन्नई सुपर किंग्जने 20 लाख रुपयांत खरेदी केलं आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x