पत्नीसोबतच्या 'त्या' फोटोवरून इरफान पठाणवर टीका

क्रिकेटपटू इरफान पठाणनं त्याची पत्नी सफा बेग बरोबरचा एक फोटो फेसबूकवर शेअर केला आहे.

Updated: Jul 18, 2017, 07:19 PM IST
पत्नीसोबतच्या 'त्या' फोटोवरून इरफान पठाणवर टीका  title=

मुंबई : क्रिकेटपटू इरफान पठाणनं त्याची पत्नी सफा बेग बरोबरचा एक फोटो फेसबूकवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यामुळे इरफान पठाणवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. इरफाननं शेअर केलेल्या या फोटोमध्ये सफानं हिजाब घातला होता तसंच चेहऱ्यावर हातही ठेवला होता.

इरफाननं शेअर केलेला हा फोटो इस्लामविरोधी आहे. कारण या फोटोमध्ये सफाचा अर्धा चेहरा दिसत आहे तसंच तिनं नेलपेंट लावलं आहे, अशी टीका करण्यात आली. तसंच एक मुस्लिम आणि पठाण असल्यामुळे पत्नीला कसं ठेवायचं हे तुला कळलं पाहिजे, अशा काही प्रतिक्रियाही इरफानच्या या फोटोवर आल्या.

या फोटोवर होत असलेल्या टीकेला इरफान पठाणनंही सडेतोड उत्तर दिलं आहे. इरफाननं पुन्हा एकदा तोच फोटो शेअर करत 'कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना..' असं म्हटलं आहे. 

 

इरफान पठाणच्या आधी क्रिकेटपटू मोहम्मद शमीवरही सोशल नेटवर्किंगवर पत्नीसोबतचे फोटो शेअर केल्यामुळे टीकेची झोड उठली होती.