धोनी दुसऱ्यांदा बाबा होणार? पाहा विराटच्या लग्नातले फोटो

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं रिसेप्शन २६ डिसेंबरला मुंबईत पार पडलं.

Updated: Dec 31, 2017, 05:45 PM IST
धोनी दुसऱ्यांदा बाबा होणार? पाहा विराटच्या लग्नातले फोटो title=

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं रिसेप्शन २६ डिसेंबरला मुंबईत पार पडलं. या रिसेप्शनला बॉलीवूड आणि क्रिकेट क्षेत्रातल्या सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती.

पण विराट आणि अनुष्काच्या रिसेप्शनमध्ये सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या धोनी आणि त्याची पत्नी साक्षीवर. धोनी आणि साक्षी मुलगी झीवासोबत या रिसेप्शनला पोहोचले होते. पण या रिसेप्शनमध्ये साक्षीला पाहून वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. धोनी हा पुन्हा बाबा होणार असल्याच्या चर्चा साक्षी धोनीचे फोटो बघून सुरू झाल्या आहेत. या चर्चा सुरु झाल्या असल्या तरी धोनी दांपत्य किंवा त्यांच्या जवळच्यांकडून या बातमीला दुजोरा मिळालेला नाही.

विराट आणि अनुष्काच्या रिसेप्शनमध्ये धोनी ब्लॅक थ्री पिस घालून तर साक्षी आणि झिवा गुलाबी रंगाचा ड्रेस घालून आल्या होत्या. धोनी आणि साक्षीचं लग्न जुलै २०१०मध्ये झालं होतं. फेब्रुवारी २०१५मध्ये या दोघांची मुलगी झीवाचा जन्म झाला होता. 

 

@mahi7781 at #virushka #weddingreception #viratkohli #anushkasharma #bollywood #popularbollywoodnews

A post shared by Love Bollywood (@popular_bollywood__news) on