Ishant Sharma: भारताचा 'हा' गोलंदाज अँडरसनपेक्षा भारी; इशांत शर्मा स्पष्टच म्हणाला...

Aus vs Eng, Ashes test 2023: अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1100 विकेट्सचा टप्पा गाठत इतिहास रचला आहे. 289 सामन्यात अँडरसनने (James Anderson) ही कामगिरी केलीये. अशातच आता टीम इंडियाचा गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) याने मोठं वक्तव्य केलंय. 

Updated: Jun 26, 2023, 04:05 PM IST
Ishant Sharma: भारताचा 'हा' गोलंदाज अँडरसनपेक्षा भारी; इशांत शर्मा स्पष्टच म्हणाला... title=
Ishant Sharma, James Anderson

Ishant Sharma on James Anderson: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Aus vs Eng) यांच्यातील ऍशेस मालिकेत इंग्लंडचा स्टार गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याच्या गोलंदाजीची धार पहायला मिळाली. अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1100 विकेट्सचा टप्पा गाठत इतिहास रचला आहे. 289 सामन्यात अँडरसनने ही कामगिरी केलीये. अशातच आता टीम इंडियाचा गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) याने मोठं वक्तव्य केलंय. बीयरबाइसेप्स युट्युब चॅनलला दिलेल्या इंटरव्हयुमध्ये इशांत शर्माने एका भारतीय गोलंदाजाची तुलना अँडरसनशी केली आहे.

काय म्हणाला Ishant Sharma ?

जेम्स अँडरसनच्या (James Anderson) गोलंदाजीची शैली आणि पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. तो इंग्लंडमध्ये भारतापेक्षा वेगवेगळ्या परिस्थितीत खेळतो. जर अँडरसन भारतात खेळला तर झहीर खान त्याच्यापेक्षा सरस गोलंदाज ठरला असता, असं इशांत शर्मा म्हणाला आहे. भारतीय पीचवर अँडरसन एवढ्या जास्त विकेट घेऊ शकला नसता. भारतीय खेळपट्ट्या या बहुदा फिरकी गोलंदाजांसाठी पुरक असतात. त्यामुळे त्याची फिरकीपटूंना मदत होते, असंही इशांत शर्मा म्हणाला आहे.

इशांत शर्माने या मुलाखतीमध्ये 2014 च्या वेलिंग्टन कसोटीतील घडलेला एक किस्सा सांगितला. या कसोटी सामन्यात इशांत शर्मावर दंड ठोठावण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी जहीरसोबत गैरवर्तवणुक केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर इशांत स्पष्ट उत्तर दिलं आहे. झहीर खान माझा गुरू होता. मी कधीही कॅच सोडल्याबद्दल कोणालाही शिवीगाळ केली नाही. मी फक्त थोडा भडकला होतो. सामना निर्णायक टप्प्यावर असल्याने माझा संयम सुटला होता, असंही इशांत शर्माने म्हटलं आहे.

आणखी वाचा - Cheteshwar Pujara: टीम इंडियामधून वगळल्यानंतर चेतेश्वर पुजाराने दिली अशी प्रतिक्रिया, पाहा Video

दरम्यान, मी जॅकला म्हणजे झहीर खानला कसं सांगू, तो माझा गुरू आहे आणि गुरूला कधी कोणी शिव्या देईल का? असा सवाल इशांतने या मुलाखतीच्या माध्यमातून विचारला आहे. इशांत आणि झहीर टीम इंडियासाठी अनेक सामने एकत्र खेळले आहेत. अनेक सामन्यात या जोडीने टीम इंडियाला टेस्ट सामने जिंकवले आहेत. मात्र, इशांतच्या संतापामुळे दोघांमध्ये वाद आहेत की काय? असा सवाल विचारला जात होता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x