"जस्प्रीत बुमराह आऊट ऑफ फॉर्म असणं टीम इंडियाच्या पराभवाचं मुख्य कारण"

जस्प्रीत बुमराह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरला.   

Updated: Jul 6, 2021, 04:28 PM IST
"जस्प्रीत बुमराह आऊट ऑफ फॉर्म असणं टीम इंडियाच्या पराभवाचं मुख्य कारण" title=

मुंबई : टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. आयसीसीच्या या स्पर्धेच्या सुरुवातीपासून टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी केली. पण अखेरच्या क्षणी टीम इंडियाला अंजिक्यपदाने हुलकावणी दिली. भारताला नमवून न्यूझीलंडने अंजिक्यपद पटकावलं. या पराभवानंतर टीम इंडियावर जोरदार टीका करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जस्प्रीत बुमराह अपयशी ठरला. बुमराह आऊट ऑफ फॉर्म असणं हे ही टीम इंडियाच्या पराभवामागील मुख्य कारण आहे, असं न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये  20 वर्षांपासून प्रशिक्षकपदावर असणाऱ्या ग्लेन पॉकनॉल यांनी म्हंटलंय. (Jasprit Bumrah is out form is big reason of team india defeat says Glenn Pocknall)   

पॉकनॉल काय म्हणाले?  

"जस्प्रीत  बुमराहचं अपयशी ठरणं हे देखील टीम इंडियाच्या पराभवामागील मुख्य कारण आहे", असं पॉकनॉल यांनी स्पष्ट केलं. ते टीओआयसोबत बोलत होते. यावेळेस त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

"बुमराह टीम इंडियाच्या गोलंदाजीचा मुख्य आणि वेगवान अस्त्र आहे. त्यामुळे बुमराह इन फॉर्म नसणं हे टीम इंडियाच्या पराभवामागील महत्वाचं कारण आहे", असंही पॉकनॉलने नमूद केलं. बुमराहल या महामुकाबल्यात प्रचंड संघर्ष करावा लागला होता. 

प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल हवा होता

"टीम इंडियाला या महत्वाच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करायला हवा होता. साऊथम्पटनमधील परिस्थिती ही वेगवान गोलंदाजांसाठी पूरक होती. त्यामुळे रवींद्र जाडेजाला बाहेर बसवून त्याजागी हनुमा विहारीला घेता आलं असतं. विहारीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही चमकदार कामगिर  केली होती", अस मत पॉकनॉल यांनी व्यक्त केलं.