मुंबई : द ग्रेट खलीला आज अनेक जण ओळखतात. रेसलिंगच्या जगतात त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खली काही दिवसांपूर्वीच जिंदर महलच्या रेंडी ऑर्टनसोबत झालेल्या मॅचमध्ये दिसला होता.
WWE मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मुळचा भारतीय असलेल्या जिंदर महलला देखील आज अनेक जण ओळखतात. मागील अनेक दिवसांपासून तो WWE चा चॅम्पियन होता. पण एजे स्टाइल्सविरोधात त्याने आपलं टायटल गमावलं.
जिंदर महलचं खरं नाव युवराज सिंह धेसी आहे. 29 एप्रिल 2011 ला स्मॅकडाउनच्या एपिसोड दरम्यान जिंदर महलने डेब्यू केलं होतं. महलच्या WWE डेब्यू नंतर २ आठवड्यातच द खली रिंगमध्ये एक सेगमेंट करतांना दिसला होता.
जिंदर महल रिंगकडे आला आणि खलीच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. त्यानंतर त्याने खलीला जोरदार २ कानाखाली लगावल्या पण खलीने त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. जिंदर महल खलीला पंजाबीमध्ये काही तरी बोलला. त्यानंतर २ कानाखाली वाजवल्या. खली या दरम्यान खूप रागात दिसला. पण जिंदरवर त्याने हात नाही उचलला. यानंतर जिंदर रिंग सोडून निघून गेला. खलीने रिंगमध्ये एका महिलेला किस केलं ते जिंदरला ते आवडलं नाही. त्यावर जिंदरने खलीला म्हटलं की, 'असं करुन अब्रु घालवतोस स्वत:ची.'
9 डिसेंबरला भारतात WWE लाईव्ह इवेंट होणार आहे. यामध्ये जिंदर महल आणि ट्रिपल एच लढणार आहेत.