Team India ला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूची अचानक निवृत्ती

Joginder Sharma Retirement : टीम इंडियाला (Team India) आणि क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या स्टार खेळाडूने (Joginder Sharma) अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या स्टार खेळाडूने ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे. 

Updated: Feb 3, 2023, 02:02 PM IST
 Team India ला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूची अचानक निवृत्ती

Joginder Sharma Retirement : न्यूझीलंडविरूद्ध टी20 मालिका विजयानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरूद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) खेळणार आहे. या स्पर्धेला येत्या 9 फेब्रुवारीपासून सूरूवात होणार आहे. या सामन्यापुर्वी टीम इंडियाला (Team India) आणि क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या स्टार खेळाडूने (Joginder Sharma) अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या स्टार खेळाडूने ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे. 

कोण आहे हा खेळाडू? 

टीम इंडियाचा स्टार खेळाडू जोगिंदर शर्मा (Joginder Sharma)याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आज जोगिंदर शर्माने (Joginder Sharma Retirement) ट्विटरवरून निवृत्तीची घोषणा केली आहे. तसेच जोगिंदर शर्माने ट्विटरवर पत्रही शेअर केले आहे, जे त्यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांना पाठवले आहे. मी बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज आणि हरियाणा सरकारचे आभार मानतो, असे जोगिंदर शर्मा यांनी म्हटले आहे. तसेच चाहते, कुटुंब, मित्रांचे आभार मानले, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील चढ-उतारांवर त्याला साथ दिली, असे देखील ते म्हणाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jogi Sharma 23 Oct (@jogi23sharma)

टी20 वर्ल्ड कपचा हिरो

टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 साली टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कपचा रियल हिरो जोगिंदर शर्मा (Joginder Sharma Retirement) ठरला होता. कारण त्याने टाकलेल्या शेवटच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करत वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. 24 सप्टेंबर 2007 चा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अद्भुत ठरला होता. त्याच दिवशी, टीम इंडिया जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करून T20 वर्ल्ड कपच्या पहिल्या आवृत्तीची चॅम्पियन बनली होती. यासोबतच महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1983 नंतर विश्वविजेतेपद पटकावले होते. 

कारकिर्द 

हरियाणातील रोहतक येथून आलेल्या जोगिंदर शर्माने (Joginder Sharma) भारतासाठी फक्त 4 वनडे आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्व टी-20 सामने केवळ वर्ल्ड कपमध्येच खेळले आहेत. 2004 मध्ये त्याने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि 2007 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. 

दरम्यान जोगिंदर शर्मा (Joginder Sharma Retirement) सध्या हरियाणा पोलिसात डीएसपी म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते हरियाणा संघाकडून रणजी ट्रॉफी देखील खेळत होते. मात्र आता त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या त्यांच्या घोषणेणे क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.