close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

व्हिडिओ: अर्रर्..! WWE स्टार जॉन सीनाचे ब्रेकअप, निकीसोबतचे प्रेम संपृष्टात

निकी बेलानेो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते की, 'अखेर सहा वर्षे एकत्र राहिल्यावर निकी बेला आणि जॉन सिना यांनी वेगले होण्याच निर्णय घेतला आहे. 

Updated: Apr 16, 2018, 08:10 PM IST
व्हिडिओ: अर्रर्..! WWE स्टार जॉन सीनाचे ब्रेकअप, निकीसोबतचे प्रेम संपृष्टात

नवी दिल्ली : WWE स्टार जॉन सिनाच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेसलमेनिया ३४ मधून एक धक्कादायक बातमी येत आहे. जॉन सिना याची पार्टनर निकी बेला सोबतचे प्रेमसंबंध संपृष्टात आले आहेत. निकी बेलानेही वृत्ताचा स्विकार केल्याचे समजते. महत्त्वाचे असे की, जॉनने निकी बेलामुळे आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार निकी बेला या ब्रेक अपमुळे अस्वस्थ आहे. तर, दुसऱ्या बाजूला एका वृत्तपत्रात दिलेल्या एका मुलाखतीत जॉन सिनाने म्हटले आहे की, जेव्हा आपल्याला प्रेमात धोका मिळतो तेव्हा आपण सांगू शकत नाही की, आपल्यावर काय वेळ आली आहे आणि आपल्या मनाची स्थिती कशी आहे.

 WWE रिंगमध्येच जॉनने निकीला केले होते प्रपोज

प्रसारमाध्यमांतून आलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये प्रेम आहे. पण, काही मुद्द्यांवर दोघांमध्ये मतभेद आहेत. हे मतभेत न मिटल्यामुळे दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय गेतला आहे. गेल्या वर्षी दोघेही एकमेकांच्या प्रेमात अकंठ डुंबले होते. गेल्या वर्षीच्या रेसलमेनियामध्ये जॉनने निकिला रिंगमध्येच आंगठी देऊन प्रेपोज केले होते. त्यानंतर सातत्याने बातम्या येत होत्या की, दोघे लवकरच लग्न करणार आहेत. दोघांचे वर्तन आणि संबंध पाहता ते इतक्या लवकर वेगळे होते अशी शक्यताही नव्हती. खास करून जॉनच्या चाहत्यांना या वृत्ताचा विशेष धक्का बसला आहे.

 

प्रेम कायम पण, मतभेदांमुळे दुरावा

निकी बेलानेो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते की, 'अखेर सहा वर्षे एकत्र राहिल्यावर निकी बेला आणि जॉन सिना यांनी वेगले होण्याच निर्णय घेतला आहे. अर्थात हा निर्णय घेणे कठीण होते. आम्ही दोघेही यापुढे नेहमीच एकमेकांचा सन्मान करू. आम्ही इतरांकडूनही  अपेक्षा करतो की, तेही आमच्या खासगी जीवनाचा सन्मान करतील.' 

दोघांकड़ूनही जाहीर स्टेटमेंट

दरम्यान, निकीच्या पोस्टनंतर काही तासांतच सिनानेही एक स्टेटमेटं दिले. वॉल्ट व्हॉटमॅनचा कोट- आम्ही एकत्र आहोत. सर्व काही आम्ही विसरलो आहोत. या स्टेटमेंटनंतर सिनाने आणखी एक लिखित स्टेटमेंट दिले. त्यात तो म्हणतो, रोस्ट डे एव्हर. दरम्यान, सादारण एक आठवड्यापूर्वी दोघेही सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिससे होते.