close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकला

कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकला आहे.

Updated: Apr 16, 2018, 08:05 PM IST
कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकला

कोलकाता : कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकला आहे. दिल्लीचा कॅप्टन गौतम गंभीरनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. गौतम गंभीरचं कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात कमबॅक झालं आहे. मागच्या वर्षीपर्यंत गंभीर कोलकात्याचा कॅप्टन होता पण यंदाच्या वर्षी तो दिल्लीच्या टीमकडून खेळत आहे. कोलकात्याच्या मैदानामध्ये परत आल्यावर मी भावूक झालो आहे, अशी प्रतिक्रिया गौतम गंभीरनं टॉसवेळी दिली. 

कोलकात्याची टीम

क्रिस लिन, सुनिल नारायण, रॉबिन उथप्पा, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, शुभमन गिल, शिवम मावी, टॉम कुरन, पियुष चावला, कुलदीप यादव 

दिल्लीची टीम

जेसन रॉय, गौतम गंभीर, ऋषभ पंत, ग्लेन मॅक्सवेल, श्रेयस अय्यर, विजय शंकर, क्रिस मॉरिस, राहुल टेवटिया, शाहबाज नदीम, मोहम्मद शमी, ट्रेन्ट बोल्ट