वेटलिफ्टिंगमध्ये खुशाली गांगुर्डेचा नवा राष्ट्रीय विक्रम

विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या १३ व्या युथ व ज्युनियर राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडची वेटलिफ्टिंगपटू  खुशाली निवृत्ती गांगुर्डे हिने  ऐतिहासिक  कामगिरी करून  महाराष्ट्र  राज्य संघासाठी  पहिले  पदक मिळवून  देण्याचा  मान मिळविला.

Updated: Feb 22, 2018, 10:55 PM IST
वेटलिफ्टिंगमध्ये खुशाली गांगुर्डेचा नवा राष्ट्रीय विक्रम  title=
विशाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या १३ व्या युथ व ज्युनियर राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडची वेटलिफ्टिंगपटू  खुशाली निवृत्ती गांगुर्डे हिने  ऐतिहासिक  कामगिरी करून  महाराष्ट्र  राज्य संघासाठी  पहिले  पदक मिळवून  देण्याचा  मान मिळविला.
 
खुशालीने स्नॅच प्रकारात १५ वर्ष जुना विक्रम मोडीत काढत ४४ किलो वजनी गटात ६१ किलो स्नॅच उचलून एक नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे.
 
एक सुवर्णपदक आणि दोन रौप्यपदकाही खुशालीने कमाई  केली आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल खुशालीवर क्रीडा  विश्वातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.