IPL 2021 : सीझनमधील 3 पैकी 2 मॅच मध्ये पराभवामुळे कोलकाताच्या, कोचकडून कॅप्टनवर टीका - टीममध्ये बदल करणार

संघ आणि जागेत बदल झाल्यामुळे त्यांची टीम चांगलं काम करेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.

Updated: Apr 19, 2021, 05:22 PM IST
IPL 2021 : सीझनमधील 3 पैकी 2 मॅच मध्ये पराभवामुळे कोलकाताच्या, कोचकडून कॅप्टनवर टीका - टीममध्ये बदल करणार title=

चेन्नई : कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य कोच ब्रेंडन मॅकलमने (Brendon McCullum) रविवारी सांगितले की, इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) मुंबईत होणार्‍या आगामी सामन्यांसाठी त्याच्या संघात काही बदल केले जातील. संघ आणि जागेत बदल झाल्यामुळे त्यांची टीम चांगलं काम करेल, अशी आशा त्याने व्यक्त केली. आयपीएल 2021 मध्ये केकेआरच्या संघाने आतापर्यंत 3 पैकी 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे ते स्कोर टेबलवर सध्या सहाव्या क्रमांकावर आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध 18 एप्रिलला झालेल्या मॅचमध्ये कोलकाताला 38 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सामना हारल्यानंतर मॅकलम म्हणाला, "आम्हाला असे खेळाडू पाहिजेत जे फीट आणि उस्फूर्त आहेत. आशा आहे की, संघात काही बदल होतील. मुंबईतील मॅच खेळल्यामुळे जागा बदलेल. नवीन जागे बरोबर आम्हाला काही ठिकाणी सुधारणा कराव्या लागतील. पुढील दोन सामन्यात आम्ही सुधारणा करुन मॅचमध्ये परत येऊ शकतो." आतापर्यंत संघाने चेन्नईमध्ये मॅचेस खेळल्या आहेत. आता ते तेथून मुंबईला आपले पुढील मॅच खेळण्यासाठी जाणार आहेत.

पहिल्याच ओव्हरमध्ये वरुण चक्रवर्तीने दोन विकेट घेतल्या, पण केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गनने त्याला गोलंदाजी करायला रोखले, त्यावर मॅकलमने टीका केली आहे. मॅकलम म्हणाला, "त्यावेळी चक्रवर्तीला गोलंदाजीतून काढून टाकायला नको हवे होते. त्याने चांगली कामगिरी करुन देखील त्याला गोलंदाजी करु न देने ही एक मोठी चूक होती. आम्हाला त्याचा एबी डिव्हिलियर्सविरूद्ध वापर करायचा होता, पण आमची योजना यशस्वी झाली नाही."

डीव्हिलियर्स ने नाबाद 76 आणि ग्लेन मॅक्सवेलने 78 धावा करुन, रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 4 विकेट्सवर 204 धावा केल्या. तर कोलकाने आठ विकेट्स गमावून 166 धावा केल्या आणि मॅच हरले.

मॅकलमकडून डीव्हिलियर्स-मॅक्सवेलचे कौतुक

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाबद्दल विचारले असता मॅकलम म्हणाला, "असे दिसते की, ते नवीन योजना घेऊन आले आहेत. त्यांच्यात खूप आत्मविश्वास दिसत आहे. त्यांच्यामुळे आमच्या हातात असलेली मॅच आम्ही हरलो. जागतिक दर्जाचे खेळाडू हेच करतात, ते विरोधी संघावर खूप दबाव आणतात. मैदानाच्या एका बाजूला बाउंड्री छोटी आहे, तर दुसर्‍या बाजूला ती मोठी आहे. पण एबी डीव्हिलियर्स आणि मॅक्सवेलने जबरदस्त फलंदाजी केली. त्यांनी आमच्या समोर मोठं लक्ष उभं केलं आणि आमच्यावर दबाव आणला.

मॅकलमला सुनील नरेन बद्दलं विचारले असता, तो म्हणाला की, "त्याला दुखापतत झाली आहे. तो पूर्णपणे फिट नाही. आजच्या सामन्यात तो खेळू शकला असता, पण त्याच्या जागेवर शाकिबला सामील केलं गेलं. कारण फलंदाजीतही त्याचे योगदान आहे."