कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएल जिंकण्यात संघाचा असिस्टंट कोच अभिषेक नायरनेही (Abhishek Nayar) महत्त्वाची भूमिका निभावली. 2022 आणि 2023 मध्ये अपेक्षित कामगिरी न करु शकलेला केकेआर संघ यावेळी थेट स्पर्धा जिंकला. चेन्नईविरोधातील सामन्यात विजय मिळवल्यानंतर वरुण चक्रवर्ती आणि वेंकटेश अय्यर यांनी त्याचं कौतुक केलं होतं. फक्त आयपीएल नव्हे तर अभिषेक नायरने 2022 मध्ये दिनशे कार्तिकच्या कमबॅकमध्येही मोलाचा वाटा उचलला होता. दरम्यान सोशल मीडियावर अभिषेक नायरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत युट्यूबर रणवीर अलाहबादियाने (YouTuber Ranveer Allahbadia) मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारल्यानंतर अभिषेक नायर आश्चर्यचकित झाला होता. खेळाडूंची कामगिरी बिघडते अशी सर्वसाधारण धारणा असल्यामुळे खेळाडूंना लैंगिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला जातो की नाही याबद्दल जाणून घेण्यास तो उत्सुक होता.
यावेळी अभिषेक नायरने ब्राझिलचा फुटबॉल दिग्गज रोनाल्डोने एकदा दिलं होतं, त्यानुसार उत्तर दिलं. रोनाल्डोला विजयानंतर सेक्स करण्यापेक्षा हे चांगले आहे का? असं विचारण्यात आलं होतं. त्यावर त्याने "मी यापूर्वी अनेकदा सामन्याआधी सेक्स केला आहे. यामुळे तुम्हाला एकाग्रतेसाठी मदत होते. सगळेच प्रशिक्षक तुम्हाला सामन्याआधी सेक्स करण्याची परवानगी देत नाहीत. पण काही सामन्यात मी सेक्स केल्याने चांगली खेळी केल्याचं जाणवलं होतं".
‘The Ranveer show’ मध्ये पोहोचलेल्या अभिषेक नायरला जेव्हा सेक्ससंबंधी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याच्या भुवया उंचावल्या होत्या. पण त्याने स्पष्टीकरण देत काही खेळाडूंसाठी ते फायद्याचं ठरतं, मात्र काहींसाठी नाही. पण ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड असते असं सांगितलं.
अँकर: क्रिकेटमध्ये सेक्स? खेळाडूंच्या जीवनात हा घटक आहे का?
नायर: तू हे सकारात्मक पद्धतीने विचारत आहेस की नकारात्मक पद्धतीने? तू खूप मोकळेपणाने प्रश्न विचारला आहे. कोणता माणूस त्याशिवाय जगू शकतो? पण ते चांगले की वाईट? तो तुमचा प्रश्न आहे का? किंवा तुमचा प्रश्न 'याचं प्रमाण किती असा आहे?
अँकर: मला याचे उत्तर द्यायचे आहे, पण तुम्ही काय उत्तर देता ते मला पहायचे आहे.
नायर: कोणीही ते करणे सामान्य आहे. ते प्रत्येकासाठी वेगळे आहे. प्रत्येक क्रिकेटपटूच्या मनात सतत विचारांचं वादळ सुरु असतं. काहींना ते आवडेल, काहीजण ते टाळतील. काही क्रिकेटपटूंचा असा विश्वास आहे की त्यांनी लैंगिक संबंध न ठेवल्यास त्यांची शक्ती आणि लक्ष्य केंद्रीत करणं वाढतं. तर तर काहीजण त्याचे अनुसरण करतात आणि शेवटी असा निष्कर्ष काढतात की त्यांच्यासाठी काहीही बदललेले नाही. त्यामुळे ही एक अतिशय वैयक्तिक गोष्ट आहे. यासंबंधी कोणताही नियम नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या गोष्टी काम करतात. कोणीही हताश नसतो, पण कधी कधी इतके दडपण येते की तुम्हाला शांत व्हायचे असते".