KKR vs CSK Playing 11 : आयपीएलच्या (IPL 2023) 33 व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR vs CSK) होणार आहे. कोलकात्याच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्सवर संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. सलग तीन सामने गमावल्याने अडचणीत सापडलेल्या कोलकाता संघाला आज (23 एप्रिल 2023) चेन्नईविरुद्ध विजयाची नोंद करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. यंदा केकेआर आणि सीएसके (KKR vs CSK) यांचा सातवा सामना होणार आहे. केकेआरने आतापर्यंत दोन विजय नोंदवले आहेत आणि चार वेळा पराभवचा सामना करावा लागला. त्याचवेळी सीएसकेने चार विजय आणि दोन पराभव स्वीकारला लागला आहे.
दरम्यान, नितीश राणा याच्या नेतृत्वाखालील केकेआर विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. कोलकाताला त्यांच्या मागील तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत केकेआर प्लेइंग इलेव्हनमध्ये आज तीन बदल पाहायला मिळू शकतात. बांगलादेशचा फलंदाज लिटन दासच्या जागी कोलकाता एन जगदीसनला संधी दिली जाऊ शकते. तर दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या गेल्या सामन्यात दासला 4 चेंडूत केवळ 4 धावा करता आल्या होत्या. मनदीप सिंगच्या जागी अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि कुलवंत खेजरोलियाच्या जागी टीम साऊथीला मैदानात उतरवले जाऊ शकते.
तर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने गेल्या दोन सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांचा पराभव केला आहे. CSK ने RCB चा 8 धावांनी तर SRH चा 7 गडी राखून पराभव केला. इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करण्याबाबत सस्पेन्स कायम आहे. दुखापतग्रस्त स्टोक्सने नुकतीच नेटमध्ये गोलंदाजी केली पण तो मॅच फिट आहे की नाही हे पाहणे बाकी आहे. स्टोक्स अजूनही अनफिट असेल तर केकेआरविरुद्ध चेन्नई संघात फेरबदल होण्याची शक्यता नाही.
रविवारी कोलकात्यात तापमान 27 ते 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. जसजशी रात्र होईल तसतसे तापमान कमी होईल. रविवारीही कोलकात्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात काहीशी घट होणार आहे. दुपारी आकाश ढगाळ असेल पण संध्याकाळी सामन्यादरम्यान आकाशातून ढग दूर होतील.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सची खेळपट्टी वर्षानुवर्षे फिरकीपटूंसाठी फायदेशीर मानली जात आहे. ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांपैकी तीन वेळा 200 धावांचा टप्पा पार करण्यात संघांना यश आले आहे. दोन्ही सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. या खेळपट्टीवर फलंदाजांनी मोठ्या प्रमाणावर धावा केल्या आहेत. उष्णतेच्या वाढीसह, खेळपट्टीतील आर्द्रता कमी होईल, ज्यामुळे खेळपट्टी खराब झाल्यामुळे फिरकीपटूंना फायदा होईल.
कोलकाता नाइट रायडर्स : जेसन रॉय, लिटन दास/एन जगदीसन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (क), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मनदीप सिंग/शार्दुल ठाकूर, कुलवंत खेजरोलिया/टिम साऊदी, उमेश यादव , वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), महेश थिकशन, तुषार देशपांडे, आकाश सिंग, मथिशा पाथिराना