मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा महान बॅट्समन एबी डिव्हिलयर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एबी डिव्हिलयर्सच्या या तडकाफडकी घेतलेल्या निर्णयामुळे त्याचे जगभरातले क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. आपल्या आक्रमक बॅटिंगमुळे एबीला जगभरातले दिग्गज बॉलरही घाबरत होते. प्रतिस्पर्धी बॉलरवर आक्रमण करणाऱ्या एबीनं निवृत्तीचा निर्णय घेऊन इमोशनल स्ट्रोक लगावला आहे. मी आता थकलो आहे. माझा टर्न संपला आहे. हा निर्णय कठीण होता. खूप वेळ मी याबाबत विचार केला त्यानंतर हा निर्णय घेतला. चांगलं क्रिकेट खेळत असताना निवृत्ती घेणे योग्य आहे, असे डेविलियर्स म्हणाला. मला आतापर्यंत दिलेल्या सहकाऱ्याबद्दल इतर खेळाडू आणि स्टाफचे आभार मानतो. इथेच थांबवण्याची ही योग्य वेळ आहे. मी सर्वांचे आभार मानतो. दक्षिण आफ्रिका आणि जगभरातील माझ्या क्रिकेट चाहत्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल आभार. पुढे खेळण्याबाबतचे माझे कोणतेही प्लान्स नाही, असं एबीनं स्पष्ट केलं आहे.
बॅटिंग करताना ३६० डिग्रीमध्ये शॉट खेळणारा जगातला एकमेव खेळाडू म्हणून एबी डिव्हिलयर्सनं त्याची ओळख निर्माण केली होती. एबी डिव्हिलयर्सचे रेकॉर्डही तो दिग्गज खेळाडू असल्याचंच दाखवून देतात.
मॅच : ११४
रन : ८७६५
सरासरी : ५४.५१
शतक : २२
मॅच : २२८
रन : ९५५७
सरासरी : ५३.५०
शतक : २५
मॅच : ७८
रन : १६७२
सरासरी : २६.१२
अर्धशतक : २५