कराचीमध्ये विराट बनवतोय पिझ्झा, व्हिडीओ व्हायरल

भारताचा कर्णधार विराट कोहलीचे भारतात जितके फॅन्स आहेत तितकेच जगभरातही आहेत. पाकिस्तानातही त्याचे चाहते आहेत. 

Updated: Jun 13, 2017, 05:28 PM IST
कराचीमध्ये विराट बनवतोय पिझ्झा, व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीचे भारतात जितके फॅन्स आहेत तितकेच जगभरातही आहेत. पाकिस्तानातही त्याचे चाहते आहेत. 

पाकिस्तानाकडे विराटसारखा कोणी खेळाडू नाही जो त्याला टक्कर देईल. मात्र त्याच्यासारखाच दिसणारा दुसरा कोहली मात्र आहे. 

कोहलीसारखा दिसणारा हा तरुण प्रोफेशनल क्रिकेटर नाहीये. तर कराचीमधील शहीद-ए-मिलातच्या एका पिझ्झा दुकानात काम करतो. 'just pakistani thing ' ने हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही गोंधळात पडाल की हा विराट कोहली तर नाही.