KKR IPL Schedule 2024 in Marathi: इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदाच्या आयपीएल सामन्यांचे वेळापत्र हे लोकसभा निवडणूक तारीख लक्षात जाहीर करण्यात आलं आहे. नुकतंच बीसीसीआयकडून 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यानचा पहिला टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत. यंदाचा पहिला सामना हा गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. येत्या 22 मार्चला आयपीएलचा पहिला सामना रंगणार आहे. यंदाच्या आयपीएल सामन्याच्या पहिल्या टप्प्यात कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे किती सामने असणार आणि ते कुठे होणार याची सविस्तर माहिती समोर आली आहे.
इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी संघांपैकी एक संघ म्हणून कोलकाता नाईट रायडर्सला ओळखले जाते. या संघाची मालकी शाहरुख खान, जूही चावला आणि जय मेहता यांच्याकडे आहे. या संघाला 2012 आणि 2014 या वर्षात आयपीएलचे विजेतेपद मिळाले आहे. कोलकाता नाईट रायडर्स हा संघ तीन सामने खेळणार आहे.
IPL 2024 SCHEDULE...!!!! #IPLonStar pic.twitter.com/QwWDkuhOko
— Johns. (@CricCrazyJohns) February 22, 2024
कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा पहिला सामना 23 मार्च 2024 रोजी सनरायजर्स हैदराबाद या संघासोबत असणार आहे. तर दुसरा सामना हा 29 मार्च 2024 रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध खेळला जाणार आहे. तसेच तिसरा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 3 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला सामना हा कोलकातामध्ये रंगणार आहे. तर दुसरा सामना हा बंगळुरुमध्ये होणार आहे. तसेच तिसरा सामना विशाखापट्टणम या ठिकाणी होणार आहे.
नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर (कॅप्टन), जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंध्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन सकारिया, मिचेल स्टार्च, अंगकृष रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गुस अॅटकिन्सन, साकिब हुसेन, हे खेळाडू यंदा कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात असणार आहेत.
आयपीएल अध्यक्ष अरुण धूमल यांनी 22 मार्चला आयपीएलचा पहिला सामना होणार असल्याचे संकेत आधीच दिले होते. आयपीएलचं वेळापत्रक दोन भागात असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. त्यानुसार 22 फेब्रुवारीला पहिला टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरा टप्पा लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर होण्याची शक्यता आहे.