Virender Sehwag Instagram Post: टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) सोशल मीडियावर सक्रिय असतो. विषय कोणताही असो, सेहवाग आपलं मत मांडण्याचा हक्क सोडत नाही. सेहवागचे ट्विट अनेकदा सोशल मीडियावर चर्चेता विषय असतात. अनेकदा सेहवाग काव्यात्मक पद्धतीने आपला मुद्दा मांडतो. तर सामाजिक प्रश्नावर देखील त्याने अनेकदा मुलाखतीमध्ये सोशल मीडियावर आपली मतं थेटपण मांडली आहेत. तर सेहवागचं विश्लेषण देखील अगदी स्प्ष्ट असतं.
मंगळवारी वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर म्हणजेच नव्या X प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तो टोमणा मारताना दिसत आहे. सेहवागने या ट्विटद्वारे कोणावर निशाणा साधला आहे हे स्पष्ट झाले नसले तरी सोशल मीडियावर याबाबत बराच काळ वाद सुरू आहे, अशातच त्याने इन्टाग्रामवर देखील सेम पोस्ट शेअर केली. त्यामुळे त्याची मोठी चर्चा झाली. सेहवागच्या पोस्टवर अनेक नेटकरी भिडल्याचं देखील दिसून आलंय.
आणखी वाचा - 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये धोनीनेच रोहितला डावललं; माजी सिलेक्टरचा धक्कादायक खुलासा!
काही लोकांचे इतके चेहरे असतात की त्यांचा फेसवॉश लवकर संपत असेल, असं म्हणत वीरेंद्र सेहवागने टोमणा मारला. दोन चेहऱ्याचे लोक धोकादायक असतात, तुम्हाला भेटलेले कोणतेही दोन चेहऱ्याचे लोक आहेत का? आणि तुमचा त्यांच्याशी डील कशी करता? शेअर करा, असं म्हणत वीरेंद्र सेहवागने टीका केली आहे. सेहवागच्या या प्रश्नावर सिक्सर किंग युवराज सिंहला हसू आवरलं नाही. युवराजने सेहवागच्या पोस्टवर कमेंट केली. आपण गेल्या 20 वर्षात हे पाहिलं नाही का? असा प्रश्न युवराजने केला आहे.
दरम्यान, वीरेंद्र सेहवागचा निशाणा सिलेक्टर्सवर असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. टीम इंडियाची निवड करताना आश्विन आणि चहल सारख्या खेळाडूंना डावलल्याने सेहवागने निशाणा साधल्याचं बोललं जातंय. तर काहींनी सेहवागची पोस्ट राजकीय असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर युवराजच्या रिप्लायवरून सिलेक्टर्सवर निशाणा असल्याचं बोललं जात आहे.