Fifa World Cup Argentina Wins : फिफा वर्ल्ड कप 2022 वर अर्जेंटिनाने नाव कोरल्यानंतर फुटबॉल विश्वात लियोनेल मेस्सीचे एकच चर्चा रंगलीय. सोशल मीडियावर मेस्सीचे वर्ल्ड कप उंचावतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. असं सर्व असताना प्रतिस्पर्धी फ्रान्सचा खेळाडू किलियन एमबाप्पेची (Kylian Mbappe) हि चर्चा आहे. त्याने एकट्याने झुंज देऊन अर्जेंटिनाच्या नाकात दम केला होता. या त्याच्या झंझावती खेळीने त्याने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या त्याच्या रेकॉर्डची फुटबॉल विश्वात चर्चा आहे.
फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर स्टार फॉरवर्ड खेळाडू किलियन एमबाप्पे (Kylian Mbappe) याला अश्रू अनावर झाले होते. त्याला रडताना पाहून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी थेट मैदान गाठलं आणि एमबाप्पेचं सांत्वन केलं. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एमबाप्पेला जवळ घेतलं आणि एकहाती झुंज दिल्याने त्याच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली. या संदर्भातले फोटो देखील व्हायरल होत आहेत.
दरम्यान फिफा वर्ल्ड कपच्या थरारक फायनल सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये (Penalty Shootout) फ्रान्सचा 4-2 ने पराभव केला. हा विजय मिळवून अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला. अर्जेटिना संघाने हा वर्ल्ड कप जिंकून मेस्सीला चांगला निरोप दिला होता.
◾ WC winner at 19
◾ WC finalist at 23
◾ Golden Boot winner
◾ A hat-trick in a WC final
◾ 1st man to score 7+ goals at a single WC since Ronaldo in 2002
◾ The most goals by a 23-year-old or younger in a single WCLet's all take a moment to appreciate Kylian Mbappé pic.twitter.com/Wp8wPvGNMo
— ESPN India (@ESPNIndia) December 19, 2022
सोशल मीडियावर एकिकडे मेस्सीच्या विजयाची चर्चा असताना, दुसरीकडे फॅन्स एमबाप्पेचेही (Kylian Mbappe) कौतूक करत आहे. एमबाप्पेने दिलेल्या एकाकी खेळीची फॅन्स प्रशंसा करतायत.