Virat vs Gambhir : 'माझा वाद फक्त मैदानात...', विराटच्या वादावर गौतम गंभीरने स्पष्टच बोलला, 'माझ्या सगळं लक्षात राहतं...'

Gautam Gambhir vs Virat Kohli : विराट कोहलीने वनडेमधील 50 वं शतक कोणत्या गोलंदाजाविरुद्ध झळकावलं होतं? असा सवाल गौतम गंभीरला विचारला गेला. त्यावेळी...

सौरभ तळेकर | Updated: Dec 23, 2023, 04:55 PM IST
Virat vs Gambhir : 'माझा वाद फक्त मैदानात...', विराटच्या वादावर गौतम गंभीरने स्पष्टच बोलला, 'माझ्या सगळं लक्षात राहतं...' title=
Gautam Gambhir, Virat Kohli

Gautam Gambhir On fight With Virat Kohli : दिल्लीची पोरं म्हणजे भांडणं अन् राडा आलाच... टीम इंडियामध्ये अशातच दोन दिल्लीच्या पोरांची भांडणं पहायला मिळतात. एक म्हणजे विराट कोहली अन् दुसरा गौतम गंभीर... आयपीएल 2015 च्या हंगामात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. त्यानंतर आयपीएलच्या गेल्या हंगामात देखील नवीन हल हक आणि विराट यांच्यातील वाद सुरु असताना गौतम गंभीर मध्ये पडला होता. त्यामुळे  दोघांमध्ये पुन्हा वाद पहायला मिळाला. अशातच आता गौतम गंभीरने विराट कोहलीच्या वादावर मोठं वक्तव्य केलं आहे.

भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत के एल राहुलच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाने दणक्यात सिरीजवर कब्जा केला. तिसरा सामना निर्णयक ठरला असून संजू सॅमसनच्या शतकीय खेळीमुळे टीम इंडियाने मागील पराभवाचा बदला घेतला आहे. अशातच सामना झाल्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गौतमने विराटवर भाष्य केलं.

नेमकं काय झालं?

विराट कोहलीने वनडेमधील 50 वं शतक कोणत्या गोलंदाजाविरुद्ध झळकावलं होतं? असा सवाल गौतम गंभीरला विचारला गेला. त्यावेळी उत्तर देताना गौतमने काळीज जिंकून घेतलं. त्यावेळी गौतमने लॉकी फर्ग्यूसनचं नाव घेतलं. तुम्ही हे पुन्हा पुन्हा दाखवा, कारण मला सर्व काही आठवतं. माझी लढत फक्त मैदानावर आहे, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. व्हिडीओमध्ये गौतम गंभीरच्या चेहऱ्यावरचं हसू होतं तेचं तुमच्या चेहऱ्यावर आल्याशिवाय राहणार नाही.

आणखी वाचा - IPL 2024 : रोहित शर्मा पुन्हा होणार Mumbai Indians चा कॅप्टन, 'या' कारणामुळे हार्दिकचा होणार पत्ता कट?

दरम्यान, एक मार्गदर्शक म्हणून, कोणीही माझ्या खेळाडूंसोबत भांडयला येऊ शकत नाही आणि याबाबत माझी थोडी वेगळी भूमिका आहे. जोपर्यंत खेळ चालू होता, तोपर्यंत मला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता, पण खेळ संपला की, माझ्या खेळाडूंशी कोणी जोरदार वाद घालत असेल, तर मला त्याचा बचाव करण्याचे सर्व अधिकार मला आहेत, असं गंभीरने एएनआय पॉडकास्टवर म्हटलं होतं.