IND vs SA Final live Score: टीम इंडिया विश्वविजेता, फायनलमध्ये साऊथ अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव

IND vs SA Final live Score: टी-20 वर्ल्डकपमध्ये आज शेवटचा म्हणजेच फायनल सामना होणार आहे. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे.

IND vs SA Final live Score: टीम इंडिया विश्वविजेता, फायनलमध्ये साऊथ अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव

IND vs SA Final live Score: T20 वर्ल्डकप 2024 चा अंतिम सामना 29 जून रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोसमध्ये रात्री 8:00 वाजता खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी एकही सामना गमावला नाही आणि आता टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या भव्य अंतिम फेरीत दोघेही आमनेसामने येणार आहेत.

29 Jun 2024, 23:06 वाजता

टीम इंडियासाठी सामना हातातून गेला असताना हार्दिक पांड्याने कमाल दाखवली अन् खतरनाक क्लासेनला तंबूत पाठवलं. क्लासेनने 27 बॉलमध्ये 52 धावा केल्या. सामना रोमांचक स्थितीत आहे.

29 Jun 2024, 22:28 वाजता

अक्षर पटेलने टीम इंडियाला तिसरी विकेट मिळवून दिली. घातक अशा स्टब्सची दांड्या अक्षरने उडवल्या.

29 Jun 2024, 22:22 वाजता

साऊथ अफ्रिकेने पावर प्लेमध्ये धमाकेदार सुरूवात केली आहे. पहिल्या 6 ओव्हरमध्ये साऊथ अफ्रिकेने 2 विकेट्स गमावून 42 धावा केल्या आहेत.

29 Jun 2024, 22:21 वाजता

आफ्रिकेची सुरूवात चांगली झाली नाहीये. पहिल्या दोन ओव्हरमध्ये दोन विकेट्स गेल्या आहेत.

29 Jun 2024, 22:15 वाजता

6 ओव्हप अखेर साऊथ आफ्रीका 42 रन्सवर 2 विकेट

29 Jun 2024, 22:01 वाजता

मार्कब 4 रन्स बनवून आऊट..अर्शदीपच्या बॉलिंगवर ऋषभ पंतने घेतली कॅच

29 Jun 2024, 21:56 वाजता

साऊथ आफ्रीकेची पहिली विकेट

29 Jun 2024, 21:34 वाजता

टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 176 धावा केल्या आहे. त्यामुळे आता साऊथ अफ्रिकेसमोर 177 धावांचं आव्हान असेल.

29 Jun 2024, 21:08 वाजता

टीम इंडिया संकटात असताना मदतीला धावला तो अक्षर पटेल... टीम इंडियाचा बापू उर्फ अक्षरने 31 बॉलमध्ये 47 धावांची वादळी खेळी केली. त्यात त्याने 4 सिक्स आणि 1 फोर मारला.

29 Jun 2024, 20:22 वाजता

टीम इंडियाला पावरप्लेमध्येच तिसरा धक्का बसला असून सूर्यकुमार यादव केवळ 3 धावांवर बाद झालाय. मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्याने विकेट थ्रो केली.