IND vs SA Final live Score: टीम इंडिया विश्वविजेता, फायनलमध्ये साऊथ अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव

IND vs SA Final live Score: टी-20 वर्ल्डकपमध्ये आज शेवटचा म्हणजेच फायनल सामना होणार आहे. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे.

IND vs SA Final live Score: टीम इंडिया विश्वविजेता, फायनलमध्ये साऊथ अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव

IND vs SA Final live Score: T20 वर्ल्डकप 2024 चा अंतिम सामना 29 जून रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोसमध्ये रात्री 8:00 वाजता खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी एकही सामना गमावला नाही आणि आता टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या भव्य अंतिम फेरीत दोघेही आमनेसामने येणार आहेत.

29 Jun 2024, 10:48 वाजता

IND vs SA Final live Score: भारताने शेवटची ICC ट्रॉफी कधी जिंकली होती?

आयसीसी स्पर्धेत भारताचा शेवटचा विजय 2013 मध्ये झाला होता. त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा 5 रन्सने पराभव केला. याआधी टीम इंडियाने 2011 च्या वनडे वर्ल्डकपवर कब्जा केला होता. आता दहा वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी भारत अजूनही आयसीसी ट्रॉफीची वाट पाहतोय.

29 Jun 2024, 10:15 वाजता

IND vs SA Final live Score: बार्बाडोसमध्ये हवामान कसे असेल?

Weather.com नुसार, पावसाचा अंदाज 70% आहे आणि स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 वाजता), खेळ सुरू होण्याची 66% शक्यता आहे. याशिवाय संध्याकाळीही हवामानाचा अंदाज असाच आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी 4:00 वाजता (भारतीय वेळेनुसार 1:30 वाजता) पावसाची 50% शक्यता आहे.

29 Jun 2024, 09:14 वाजता

IND vs SA Final live Score: टी-20 वर्ल्डकपमध्ये कसा आहे टीम इंडियाचा प्रवास

गेल्या दहा वर्षांपासून भारत प्रत्येक वेळी वर्ल्डकप विजेतेपदाचा प्रमुख दावेदार आहे, परंतु प्रत्येक वेळी पराभव सहन करावा लागला. 2014 च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा श्रीलंकेकडून 6 विकेट्स राखून पराभव झाला होता. यानंतर 2016, 2021 आणि 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमला निराशेचा सामना करावा लागला. तर भारताने 2016 आणि 2022 मध्ये उपांत्य फेरी गाठली होती.

29 Jun 2024, 08:45 वाजता

IND vs SA Final live Score: टीम इंडिया 10 वर्षांचा दुष्काळ संपवणार?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 वर्ल्डकप 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता जेतेपदाच्या लढाईत त्याचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. टीम इंडिया 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर फायनलमध्ये पोहोचली आहे.