IND vs PAK LIVE Score: भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, 228 धावांनी मिळवला विजय

India vs Pakistan Live Score Asia Cup 2023: भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे.

IND vs PAK LIVE Score: भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, 228 धावांनी मिळवला विजय

India vs Pakistan Live Score Updates: 10 सप्टेंबर रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामना रंगला होता. मात्र यावेळी पावसाने खोडा घातला. पाऊस इतका होता की, पुढे सामना खेळवता आला नाही. अखेर हा सामना आज खेळवला जाणार आहे. 

11 Sep 2023, 23:05 वाजता

India vs Pakistan Live Update 
एशिया कप स्पर्धेच्या सुपर फोर सामन्यात भारतीय फलंदाजांनंतर गोलंदाजांनीह कमाल केली. भारताने पाकिस्तानचा तब्बल 228 धावांनी विजय मिळवलाय. क्रिकेटच्या इतिहासात भारताने पाकिस्तानवर मिळवलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. याआधी पहिली फलंदाजी करताना भारताने 356 धावांचा डोंगर रचला. विराट कोहली आणि केएल राहुलने दमदार शतक ठोकलं. यावर भारतीय गोलंदाजांनी कळस चढवला. पाकिस्तानला अवघ्या 128 धावा करता आल्या. पाकिस्तानने 8 विकेट गमावत 128 धावा केल्या. पाकिस्तानचे शेवटचे नसीम शाहा आणि हॅरीस रौफ फलंदाजीसाठीच उतरले नाहीत. भारतातर्फे चायनामन कुलदीप यादवने तब्बल पाच विकेट घेतल्या. तर बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतली.

11 Sep 2023, 22:27 वाजता

India vs Pakistan Live Update 

एशिया कप स्पर्धेच्या सुपर फोर सामन्यात भारतीय फलंदाजांनंतर गोलंदाजांनीह कमाल केली आहे. अवघ्या 96 धावात पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत परतलाय. कुलदीप यादवने 2 तर बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतलीय.

11 Sep 2023, 20:13 वाजता

India vs Pakistan Live Update 
एशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा एकदा पावसाचा व्यत्यय आला आहे. पाकिस्तानने 2 विकेट गमावत 44 धाव केल्यात. इमाम-उल-हक 9 तर कर्णधार बाबर आझम 10 धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याने बाबरला क्लिन बोल्ड केलं.

11 Sep 2023, 20:05 वाजता

भारताने दिलेल्या 357 धावांचं आव्हान पार करताना पाकिस्तानला दुसरा झटका बसला आहे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम 10 धावा करत तंबुत परतला आहे.

PAK 43/2 (10.4)

11 Sep 2023, 19:36 वाजता

India vs Pakistan Live Update 
टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारताला पहिला यश मिळवून दिलं आहे. सामन्याच्या पाचव्या षटकात बुमरहाने पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज इमाम-उल-हकला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. बुमराहच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने त्याचा झेल पकडला. इमाम 9 धावा करुन बाद झाला

11 Sep 2023, 18:29 वाजता

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट 77 वी सेंच्युरी पूर्ण केली आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने 13000 धावांचा टप्पा देखील गाठला आहे.

11 Sep 2023, 18:23 वाजता

KL Rahul Century : कमबॅक सामन्यात केएल राहुलचं वादळी शतक ठोकलंय. केएल राहुलने 100 चेंडूत पाकिस्तानला घाम फोडला. 10 फोर आणि 2 सिक्स मारत त्याने शतक पूर्ण केलं.

11 Sep 2023, 18:13 वाजता

केएल राहुलने पाकिस्तानच्या गोलंदाजांना दिवसाढवळ्या चांदण्या दाखवल्या आहेत. केएल राहुल आणि विराट कोहलीने विकेट न गमावून देता सामना खेचला आहे. 45 ओव्हरमध्ये 300 चा आकडा पार केला आहे.

11 Sep 2023, 17:43 वाजता

पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीने 55 बॉलमध्ये 50 धावांची खेळी केलीये. यात त्याने 4 चौकार खेचले आहेत.

11 Sep 2023, 17:19 वाजता

KL Rahul Fifty : कमबॅकनंतर केएल राहुलने दमदार अर्धशतक ठोकलंय. केएल राहुलने 60 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलंय.