IND vs PAK LIVE Score: भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, 228 धावांनी मिळवला विजय

India vs Pakistan Live Score Asia Cup 2023: भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे.

IND vs PAK LIVE Score: भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, 228 धावांनी मिळवला विजय

India vs Pakistan Live Score Updates: 10 सप्टेंबर रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामना रंगला होता. मात्र यावेळी पावसाने खोडा घातला. पाऊस इतका होता की, पुढे सामना खेळवता आला नाही. अखेर हा सामना आज खेळवला जाणार आहे. 

11 Sep 2023, 17:04 वाजता

के एल राहुल आणि किंग कोहलीची 50 धावांची पार्टनरशिप. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच भारताचा फॉर्म कायम. 

11 Sep 2023, 17:03 वाजता

के एल राहुल आणि किंग कोहलीची 50 धावांची पार्टनरशिप 

11 Sep 2023, 16:43 वाजता

पावसाच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर आता सामन्याला सुरूवात झाली आहे. केएल राहुल अन् विराट कोहली मैदानात परतले आहेत.

11 Sep 2023, 16:02 वाजता

भारत आणि पाकिस्तान सामना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. खेळपट्टीचं परीक्षण करण्यात येत आहे. त्यानंतर सामना किती वाजता सुरू होईल? याचं उत्तर मिळेल.

11 Sep 2023, 14:40 वाजता

भारत पाकिस्तान सामन्यात तिकीटांबाबत एशियन क्रिकेट काऊंसिलने मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे तो निर्णय पाहुया-

IND vs PAK सामना पाहण्यासाठी तिकीटाची गरज नाही? पाहा काय आहे ACC चा निर्णय

11 Sep 2023, 14:18 वाजता

पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना 11 सप्टेंबर रोजी उर्वरित खेळवण्यात येणार आहे. मात्र यावेळी एक विचित्र योगायोग बनताना दिसतोय. काय आहे हा नेमका योगायोग जाणून घेऊया. पाहा लिंक- 

Asia Cup 2023 : टीम इंडियासोबत 1524 दिवसांनी बनतोय विचित्र योगायोग; आकडे वाचून डोकं गरगरेल

 

11 Sep 2023, 13:54 वाजता

कोलंबोमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे. आजही भारत-पाकिस्तान यांच्यातील खेळावर संकट ओढवले आहे. सामना झाला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. राखीव दिवस ठेऊन काही फायदा होणार नाही.

11 Sep 2023, 13:06 वाजता

पावसाच्या व्यत्ययाने 11 सप्टेंबर रोजी उर्वरित सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र यावेळी एक विचित्र योगायोग बनताना दिसतोय. काय आहे हा नेमका योगायोग जाणून घेऊया.

11 Sep 2023, 12:58 वाजता

सलग 3 दिवस खेळणार टीम इंडिया

सोमवारी पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळल्यानंतर भारतीय संघाला मंगळवारी, १२ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धही सामना खेळायचा आहे. हा सामनाही ५०-५० ओव्हर्सचा असेल. अशा स्थितीत टीम इंडिया सलग तीन दिवस अॅक्शनमध्ये दिसणार आहे, जी वर्ल्ड कपपूर्वी भारतीय खेळाडूंसाठी अडचणीची ठरू शकते.

11 Sep 2023, 12:30 वाजता

10 सप्टेंबर रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यातील सामना सुरु झाला खरा, मात्र पावसाच्या व्यत्ययाने सामना रिझर्व्ह डे च्या दिवशी म्हणजेच आज पूर्ण करण्यात येणार आहे.