हल्ली मुलं उशिरा बोलतात, लहान वयातच लठ्ठपणा! मुलांच्या 'या' परिस्थितीला काय जबाबदार?

मुलं उशिरा बोलतात, बोलताना अडखळतात; लहान वयातच लठ्ठ होतात; मुलांच्या 'या' समस्यांना फक्त एकच गोष्ट जबाबदार?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 19, 2024, 02:16 PM IST
हल्ली मुलं उशिरा बोलतात, लहान वयातच लठ्ठपणा! मुलांच्या 'या' परिस्थितीला काय जबाबदार? title=

आताच्या मुलं फार उशीरा बोलायला लागतात. किंवा त्यांना बोलताना फार समस्या जाणवतात. अशावेळी नेमकं काय चुकतंय हे अनेक पालकांना कळत नाही. तज्ज्ञांनी सांगितलं यामागचं मुख्य कारण? 

मुलं अवघ्या काही महिन्यांत हुंकारे देऊन बोलण्याचा प्रयत्न करतात. पण आताच्या मुलांमध्ये बोलण्याबाबत फार समस्या जाणवतात. मुलं अगदी दीड-दोन वर्षांची झाली तरीही बोलत नाही. किंवा लहान वयापासूनच त्यांना लठ्ठपणाची समस्या जाणवते. तसेच मुलांच्या तब्बेती देखील दिवसेंदिवस बिघडत राहतात. या सगळ्याला एकच कारण म्हणजे टेक्नॉलॉजी. 

आताची मुलं अगदी आईच्या गर्भातच मोबाईलसारख्या टेक्नॉलॉजीला अनुभवतात. आता मुलांना अगदी शांत करायला किंवा जेवण भरवताना देखील मोबाईल दाखवला जातो. पण या मोबाईलचा मुलांवर विपरित परिणाम होत आहे. मुलांच्या नजरेवर आणि खास करुन मेंदूवर याचा परिणाम होत आहे. मुलांचा मेंदू यामुळे कमकुवत होत आहे. अभ्यासानुसार, मोबाइल फोनचा अतिवापर हा स्मरणशक्ती कमी करण्यास आणि लठ्ठपणा वाढवण्यास जबाबदार असल्याचं दिसून आलं आहे. 

अनेक आजारांचा धोका 

जर्नल ऑफ द इंटरनॅशनल चाइल्ड न्यूरोलॉजी असोसिएशनमध्ये पब्लिश झालेल्या अभ्यासानुसार, मुलांना मोबईलचा सर्वाधिक धोका आहे. जगभरात ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. डॉक्टर एरिक सिगमॅनने आपल्या पेपरमध्ये लिहिलं आहे की, मुलांचा वाढता मोबाइलचा वापर जीवघेणा आहे. 

मुलं दिवसातून कमीत कमी तीन ते चार तास मोबाईलवर असतात. किंवा इतर स्क्रीन पाहतात. यामुळे त्यांना डायबिटिस, हृदयाचे आजार किंवा मेंदूशी संबंधीत त्रास होतो. तसेच त्यांना वजन वाढीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. 

मुलांसाठी धोकादायक 

मुलं स्क्रिन पाहतात तेव्हा त्यांच संपूर्ण लक्ष फक्त त्या स्क्रिनकडे असते. नजरेने ते स्क्रिनवरील हलणारी चित्र पाहत असतात. पण त्यांची ऐकण्याची स्मरण करण्याची क्षमता कमी होते. यामुळे मुलं फार उशिरा बोलतात. किंवा त्यांना बोलताना अनेक अडचणी येतात. एवढंच नव्हे तर या मोबाईलमुळे मुलांची स्मरणशक्ती देखील कमी होते. एवढंच नव्हे तर या मोबाईलमुळे मुलांची स्मरणशक्ती देखील कमी होते. यामुळे मुलांच्या मेंदूचा विकसित योग्य प्रकारे होत नाही. मुलांना ऑटिज्म सारखा अतिशय खतरनाक आजार होतो. यामुळेच 15 वर्षांखालील मुलांचा स्क्रीन टाइम अतिशय कमी असणे आवश्यक आहे. अनेक मुलांना अगदी कमी वयातच डोळ्याचा चष्मा लागला आहे. तर काहींना डोळ्यांची जळजळ, सतत डोळ्यामधून पाणी येणे यासारख्या समस्या जाणवतात.